Private Part Hygiene Tips: प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका! ‘या’ ५ गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या

Manasvi Choudhary

वैयक्तिक स्वच्छता

आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींसोबतच स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकजण ग्रूमिंग आणि फेसकेअरवर हजारो रुपये खर्च करतात, मात्र संपूर्ण शरीराच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे (प्रायव्हेट पार्ट) लक्ष देत नाही.

Personal Hygiene Tips | Saam Tv

वैयक्तिक स्वच्छतेसाठी महत्वाच्या सवयी

वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास जंतु संसर्ग, जळजळ आणि दुर्गंधी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. वैयक्तिक स्वच्छतेसाठी कोणत्या ५ महत्त्वाच्या सवयीची काळजी घेतली पाहिजे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

Personal Hygiene Tips

कोमट पाणी आणि गंधहीन साबणाचा वापर

वैयक्तिक भागाची स्वच्छता करण्यासाठी नेहमी कोमट पाणी आणि सौम्य साबणाचा वापर करा. तीव्र सुवासिक किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्समुळे त्वचेची जळजळ होऊ शकते.

Personal Hygiene Tips | pinterest

शौचालय वापरल्यानंतरची काळजी

शौचालय वापरल्यानंतर स्वच्छता राखण्यासाठी टिश्यू पेपरचा योग्य वापर करा, जेणेकरून ओलावा आणि जंतूंचा संसर्ग टाळता येईल.

Personal Hygiene Tips | Saam Tv

मासिक पाळीदरम्यान विशेष काळजी

महिलांनी मासिक पाळीच्या काळात संसर्ग आणि बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी दर ४ ते ५ तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

Personal Hygiene Tips | Google

सुती अंतर्वरणांचा वापर

महिला व पुरुष दोघांनीही नेहमी सैल आणि सुती अंतवस्त्रांचा वापर करावा. तसेच ती पूर्णपणे कोरडी करूनच परिधान करावीत, कारण ओलाव्यामुळे होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो.

Personal Hygiene Tips

व्यायाम किंवा पाण्यात पोहल्यानंतर घ्या काळजी

जिममध्ये व्यायाम केल्यानंतर किंवा पोहल्यानंतर कधीही ओले कपडे अंगावर जास्त वेळ ठेवू नका. ओल्या कपड्यांमुळे त्वचेवर पुरळ, खाज किंवा इतर त्वचेचे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो

Personal Hygiene Tips | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: ऑफिस लूकसाठी लेटेस्ट आणि ट्रेडिंग 5 मंगळसूत्र, या डिझाईन्स तुम्हालाही नक्की आवडतील

Latest Mangalsutra For Office Going Woman
येथे क्लिक करा..