Jason David Frank: मनोरंजन क्षेत्रातून एक दुख:द बातमी येत आहे. पॉवर रेंजर्सपैकी एक जेसन डेव्हिड फ्रँकचे वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट डेव्हिड फ्रॅंक प्रसिद्ध असून त्याने टेक्सासमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त मिळत आहे. सोबतच त्याच्या निधनाची माहिती पॉवर रेंजर्स फ्रँक्समधील सह-कलाकार वॉल्टर ई. जोन्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.पोस्ट शेअर करत त्याने शोकही व्यक्त केला आहे.
जस्टिन हंटने एका निवेदनात म्हटले आहे की, या कठीण वेळी त्याच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या गोपनीयतेचा आदर करणे महत्वाचे आहे कारण आम्ही अशा प्रिय व्यक्तीला गमावले आहे. त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वस्व प्रियजनांसाठी, मित्रांसाठी आणि चाहत्यांसाठी दिले आहे. त्याची कमतरता प्रत्येक वेळी भासणार आहे.
28 ऑगस्ट 1993 ते 27 नोव्हेंबर 1995 पर्यंत चाललेल्या पहिल्या सीझनमध्ये टॉमी ऑलिव्हरची भूमिका फ्रँकने साकारली होती. त्याचे एकूण 145 भाग तीन भागांमध्ये प्रसारित करण्यात आला होता. फ्रॅंकची ग्रीन रेंजरची भूमिका चौदाव्या एपिसोडनंतर नव्हती. परंतु त्याच्या चाहत्यांमुळे आणि मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला व्हाइट रेंजर आणि इतर मालिकेंसाठी संघाचा नवीन कमांडर म्हणून मालिकेत पुन्हा एकदा त्याची निवड करण्यात आली.
रेड झिओ रेंजर, रेड टर्बो रेंजर आणि ब्लॅक डिनो रेंजर, मायटी मॉर्फिन पॉवर रेंजर्स: द मूव्ही आणि टर्बो: ए पॉवर रेंजर्स मूव्ही या चित्रपटांमध्ये देखील फ्रॅंकने महत्वाची भूमिका साकारली आहे. फ्रँक 2009 आणि 2010 मध्ये अनेक मिश्र मार्शल आर्ट बाउटमध्ये लढला. तेव्हापासून त्याला मिक्स मार्शल आर्टिस्ट म्हणूनही ओळखले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.