Lagnacha Shot Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagnacha Shot: मराठी सिनेसृष्टीतील फ्रेश जोडी; टेलिव्हिजनचे कलाकार झळकणार मोठ्या पडद्यावर

Lagnacha Shot Marathi Movie: टेलिव्हिजनचे लोकप्रिय चेहरे अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार. ‘लग्नाचा शॉट’ चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार.

Shruti Vilas Kadam

Lagnacha Shot: मराठी सिनेसृष्टीला आणखी एक नवी आणि फ्रेश जोडी मिळणार असून टेलिव्हिजनवरून लोकप्रिय झालेले अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. अक्षय गोरे दिग्दर्शित ‘लग्नाचा शॉट’ या आगामी चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने घराघरांत पोहोचलेले हे दोन्ही कलाकार आता रुपेरी पडद्यावर आपली केमिस्ट्री सादर करणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रियदर्शिनी इंदलकरने याआधी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये नामांकित कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटातून ती पहिल्यांदाच टेलिव्हिजनवरून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्यासोबत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियदर्शिनी एका वेगळ्या रोमँटिक भूमिकेत दिसणार असून तिच्यासाठी हा अनुभव खास ठरल्याचे ती सांगते. चित्रपटात एक खास रोमँटिक गाणेही असून त्यामधील रोमान्स तिने पहिल्यांदाच अशा स्वरूपात साकारल्याचे ती आवर्जून नमूद करते.

प्रियदर्शिनीच्या मते, अभिजीतसोबत काम करताना तिला खूपच सहज वाटले. तो शिस्तबद्ध, संयमी आणि सहकलाकाराची काळजी घेणारा अभिनेता आहे. चित्रीकरणादरम्यान सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी तो नेहमीच जागरूक असतो. तालमींवर भर देणाऱ्या प्रियदर्शिनीला ‘सीन पुन्हा करूया’ असे सुचवले तरी अभिजीतने नेहमीच मनापासून साथ दिली, त्यामुळे संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव समाधानकारक ठरला.

दुसरीकडे, अभिजीत आमकरसाठीही हा चित्रपट विशेष आहे. रंगभूमीपासून सुरू झालेला त्याचा अभिनयाचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचत आहे. माध्यम कोणतेही असो, मेहनत आणि प्रामाणिकपणा तोच असल्याचे अभिजीत सांगतो. प्रियदर्शिनीबद्दल बोलताना तो तिच्या एकाग्रतेचे आणि वेगळ्या अभिनयशैलीचे कौतुक करतो. चित्रपटातील कथा ओळख नसलेल्या दोन व्यक्तींभोवती फिरत असल्याने दोघांमधील केमिस्ट्री महत्त्वाची होती आणि ती उत्तम जमल्याचा विश्वास तो व्यक्त करतो.

महापर्व फिल्म्स आणि जिजा फिल्म कंपनी प्रस्तुत ‘लग्नाचा शॉट’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अक्षय गोरे यांनी केले असून गीत-संगीताची जबाबदारी प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी सांभाळली आहे. अक्षय महादेव गोरे, विजय महादेव गोरे, अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येत्या ६ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या नव्या जोडीकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवदर्शनाहून येताना काळाचा घाला, बस-टँकरची धडक, ४ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

Maharashtra Live News Update : माघी गणेश जयंती निमित्ताने दगडूशेठ दर्शनासाठी गर्दी...

Ladki Bahin Yojana: ती एक चूक अन् लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; केवायसी करुनही पैसे नाही; कारण काय?

Nagpur : प्रेमातील नकार पचवता आला नाही, तरूणीची घरात घुसून हत्या, गळा दाबला अन् डोके भींतीवर आदळले

Ganesh Jayanti auspicious rituals: आज गणेश चतुर्थी; गौरी-गणेश जयंतीनिमित्त पंचांगात काय विशेष?

SCROLL FOR NEXT