Uma Ramanan Passed Away
भारतीय संगीतसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. तामिळ गायिका उमा रमणन यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे काल अर्थात १ मे ला त्यांचे एका दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मात्र, त्यांचे निधन कशामुळे झाले याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. तमिळ चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक गाणी दिलेली आहे. (Tollywood)
उमा रामनन यांच्या पश्चात गायक आणि पती ए.व्ही. रामनन, मुलगा विघ्नेश रामनन होते. त्या एक प्रशिक्षित शास्त्रीय गायिका होत्या. उमा रामनन हे नाव तेलुगू इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावर कलाकारांसह चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उमा रामनन यांनी १९७७ मध्ये "श्री कृष्ण लीला" चित्रपटासाठी पहिल्यांदा गायले होते. (Singer)
उमा रामनन यांना 'निझलगल' या तामिळ चित्रपटातील 'पूंगाथावे थाल थिरावई' गाण्याने विशेष ओळख दिली. इलैयाराजा व्यतिरिक्त उमा यांनी विद्यासागर, मणिशर्मा आणि देवा या संगीतकारांसोबतही गाणी गायली आहेत. उमा रामनन प्रशिक्षित गायिका होत्या. त्यांनी 35 वर्षांत 6,000 हून अधिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. उमा यांनी पती आणि संगीतकार ए.व्ही.रामननसाठी अनेक गाणे गायले असले तरी इलैयाराजा यांच्या सहवासामुळेच त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. इलैयाराजा यांच्यासोबत त्यांनी १०० पेक्षा जास्त गाण्यांमध्ये काम केले आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.