Ponniyin Selvan 2 4th Day Box Office Collection Instagram @aishwaryaraibachchan_arb
मनोरंजन बातम्या

Ponniyin Selvan 2 Box Office Collection: पुन्हा दाक्षिणात्य चित्रपट ठरले सरस: अवघ्या 4 दिवसात 'पोन्नियन सेल्वन 2'ने ओलांडला 200 कोटींचा गल्ला

Ponniyin Selvan 2 Crossed 200 Crore: 'पोन्नियन सेल्वन 2' चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Pooja Dange

PS 2 Box Office Collection: मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नियन सेल्वन 2' हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला प्रदर्शित झालं. पहिला वीकएंड चित्रपटासाठी खुपच यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 105.02 कोटींची कमाई केली आहे.

PS 2 ला चित्रपटाला देशातील तामिळनाडूमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी तामिळनाडूमध्ये 58.04%, हिंदीमध्ये 14.21% आणि 34.39% मल्याळम आणि तेलुगु 25.66% कमाई केली आहे.

जगभरात कल्की कृष्णमूर्तीच्या पाच भागांच्या कादंबरी मालिकेवर आधारित असलेल्या या चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 'पोन्नियन सेल्वन 2' चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संस्थेने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत चित्रपटाच्या यशाची माहिती दिली आहे. त्यंनी ट्विटमध्ये लिहिले अडथळ्यांना दूर सारत जग जिंकलो. 'पोन्नियन सेल्वन 2'ने जगभरात २०० कोटींची कमी केली आहे. आणि अजुनकमाई करत आहेत. ⚔️ #ps2 #PonniyinSelvan2.”

चित्रपट विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी सोमवारी सांगितले होते की, हा चित्रपट दोन सर्वात मोठ्या तमिळ हिट्स, बीस्ट आणि वारीसूच्या आयुष्यभरातील कलेक्शन टप्पा पार करेल. त्यांनी ट्विटरवर लिहिले, "आज #पोनियिनसेल्वन भाग 2 #Beast[₹153.64 cr] आणि #Varisu[₹195.20 cr] च्या आजीवन कलेक्शन पार करेल." (Latest Entertainment News)

'पोन्नियन सेल्वन 2' चे कलेक्शन आणखी वाढेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. PS 2 मध्ये विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिवन, रहमान आणि विक्रम प्रभू यांच्या भूमिका आहेत.

'पोन्नियन सेल्वन 2' या चित्रपटाचे बजेट २५० कोटी आहे. तर या चित्रपटाने ४ दिवसात २०० कोटींचे कलेक्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT