Aishwarya Rai Ponniyin Selvan 2 Become Big Hit: पोन्नियन सेल्वन या ऐतिहासिक चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाचा दुसरा देखील नुकतंच प्रदर्शित झाला आहे. 'पोनियिन सेल्वन 2' 28 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस उलटले आहेत. मणिरत्नम दिग्दर्शित या पीरियड ड्रामा चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन दमदार होते. चला जाणून घेऊया या चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन.
चियान विक्रम आणि ऐश्वर्या राय अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यात यशस्वी झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या आकडेवारीतही हे दिसून आले. PS 2 ने पहिल्या दिवशी 32 कोटींचा व्यवसाय केला.
वीकेंडला चित्रपटाच्या तिकीट विक्रीचा आलेख वाढतो, पण सुरुवातीच्या ट्रेंडवर विश्वास ठेवला तर चित्रपटाचा आलेख थोडा कमी झाला आहे. बॉक्स ऑफिस मूव्ही रिव्ह्यूजनुसार, चोळ वंशाच्या इतिहासावर आधारित PS2 ने दुस-या दिवशी 22 ते 25 कोटींचा व्यवसाय केला आहे.
PS2 ने पहिल्या दिवशी जगभरात 64.14 कोटींचे एकूण जगभर कलेक्शन केले. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, 'पोन्नियन सेल्वन 2' ने अवघ्या दोन दिवसांत जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
'पोन्नियन सेल्वन २' या चित्रपटाने भारतात ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हा चित्रपट देशांतर्गत कलेक्शनमध्येही १०० कोटींचा टप्पा पार करेल. आजचा राऊरविवार या चित्रपटासाठी महत्त्वाचा असेल.
मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1955 मध्ये आलेल्या कल्की कृष्णमूर्ती याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. दोन भागात विभागलेल्या या संपूर्ण चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय दुहेरी भूमिकेत आहे. तृषा कृष्णन, कार्ती आणि चियान विक्रम यांच्या अभिनयानेही चित्रपटाची शोभा वाढवली आहे.
ऐश्वर्या रायचा 'PS 2' सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाला टक्कर देत आहे, हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये भरपूर क्रेझ दिसून आली, पण चित्रपटाच्या आकड्यांमध्ये ती जाणवली नाही.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 9व्या दिवशी 3.30 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन 97.76 कोटी झाले आहे. रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळाला तर तो 100 कोटींचा टप्पा सहज पार करेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.