72 Hoorain News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

72 Hoorain Movie News: 72 हुरें सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात पोलिसांत तक्रार; काय आहे प्रकरण?

72 Hoorain Movie News: '72 हुरें ' सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Mumbai News: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘72 Hoorain’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्पेशल स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान, आता या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबईत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

'72 हुरें' सिनेमा सध्या चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी, ७ जुलै रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपट निर्मात्यांविरोधात मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सय्यद अरिफली महम्मदली नावाच्या व्यक्तीने गोरेगाव पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचे सय्यद अरिफली महम्मदली याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

सय्यद अरिफली महम्मदली नावाच्या व्यक्तीने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. '72 हुरें'चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंग चौहान यांनी केले आहे. तर अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आपल्या तक्रारीत सय्यद अरिफली महम्मदलीने म्हटले आहे की, '72 हुरें' चित्रपटाने आपल्या धर्माचा अपमान केला आहे. हा चित्रपट जातीय भेदभाव आणि द्वेषाला प्रोत्साहन देतो. या चित्रपटामुळे लोकांमध्ये मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन होईल. दरम्यान, '72 हुरें' सिनेमाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.

काश्मीरमधील राजकीय पक्षाने घेतला आक्षेप

दरम्यान, काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी 72 हुरें चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. काश्मीरमधील राजकीय पक्षाने चित्रपटात दाखवलेल्या दहशतवाद्यांच्या मानसिक छळाच्या दृश्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

चित्रपटात मांडलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे विशिष्ट धर्माबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्याचबरोबर समाजावर विपरित परिणाम होईल , असे या राजकीय पक्षांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT