Jacqline Fernandez Money Lawndring Case: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होत नाहीत. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीने जॅकलिनच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. जॅकलिनने परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं ईडीने सांगितलंय. मात्र पटियाला हाऊस कोर्टाने शनिवारी जॅकलिनला दिलासा देत अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवला.
या प्रकरणातील नियमित जामीन आणि इतर प्रलंबित अर्जांवर 10 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने ईडीला सर्व पक्षकारांकडून आरोपपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत.
सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED)ने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. पटियाला हाऊस कोर्टाने 26 सप्टेंबर रोजी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला या प्रकरणात 50,000 रुपयांच्या जामीनावर अंतरिम जामीन मंजूर केला होता.
सुकेशने जॅकलिनला महागड्या कार आणि महागड्या गिफ्ट्स दिले होते. अभिनेत्रीच्या कुटुंबियांना त्याने कारही भेट दिली आहे. मुंबईतील पिंकी ईरानी जी सुकेशची एजंट होती, तिने सुकेशची जॅकलिनसोबत ओळख करून दिली होती. जॅकलिन सुकेशच्या जाळ्यात पूर्णपणे फसली होती आणि तिने लग्न करण्याचाही विचार केला होता.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरला 200 कोटींचा केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली असून या प्रकरणी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजची नावे समोर आली आहेत. याप्रकरणात प्रामुख्याने नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. त्यामुळे तिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे.
ईडीचे आरोप
मात्र जॅकलिनच्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे. कारण जॅकलिन चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. जॅकलिनने भारतातून पलायन करण्याचा एक प्रयत्नही केला, जो अयशस्वी ठरला आहे, असं ईडीने कोर्टात सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.