ott platform
ott platformSaam Tv

Top 3 Webseries: ओटीटी प्रेमींसाठी खास दिवाळी गिफ्ट; पाहा 'या' वेबसीरिज

तेव्हापासून घरबसल्या प्रेक्षक ओटीटीवर चित्रपट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्रेमींना खास भेट अनुभवायला मिळणार आहे.
Published on

Top 3 Web Series: सध्या ओटीटीवर प्रेक्षकांना अनेक दर्जेदार चित्रपट आणि चांगल्या आशयाच्या वेबसीरिज पाहायला मिळत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी काहीच असे चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. बॉयकॉट ट्रेंडच्या रडारवर काही चित्रपट येताना दिसत असून काहींना त्याचा फायदा झाला तर काहींना त्याचा तोटा झाला. फायदा झाला तो एकाच चित्रपटाला, तो चित्रपट म्हणजे ब्रम्हास्त्र. लॉकडाऊनपासून चित्रपटसृष्टीने चांगलाच सपाटून मार खाल्ला आहे.

ott platform
Sonu Sood Upcoming Movie: सोनू सूद दिसणार नव्या अवतारात, आगामी चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

तेव्हापासून घरबसल्या प्रेक्षक ओटीटीवर चित्रपट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्रेमींना खास भेट अनुभवायला मिळणार आहे. मुख्यबाब म्हणजे जादूटोणा या विषयावरील तीन टॉप वेबसीरिज प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. नेहमीच ओटीटी विश्वात प्रेक्षकांना नवा आशय पाहायला आवडतो. प्रेक्षक नेहमीच ओटीटी विश्वात काय नवीन पाहायला मिळणार याच्या शोधात असतात. या महिन्यात मंत्रतंत्रासोबत ड्रामा सुद्धा पाहायला मिळणार आहे.

ott platform
Bigg Boss Marathi Season 4: बिग बॉसच्या घरात अक्षय आणि तेजस्विनीची जुळली 'रेशीमगाठ', पाहा व्हिडिओ...

या महिन्यात राकन का रहस्य, द लॉर्ड ऑफ द रिंग्ज: द रिंग्ज ऑफ पॉवर, हाऊस ऑफ द ड्रॅगन या तीन वेबसिरिज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. या वेबसिरिजने प्रेक्षकांना कथेसोबत खिळवून ठेवण्यात बाजी मारली आहे.

दहन- राकन का रहस्य

हॉरर, मिस्ट्री, सस्पेन्स हे पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास पर्वणीच म्हणता येईल. नऊ एपिसोडमध्येही वेबसीरिज प्रदर्शित होणार असून डिज्नी हॉटस्टार वर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. सर्वाधिक पाहिली गेलेल्या वेबसीरिजने मान पटकवला आहे.

ott platform
Bhumi Pednekar Diwali Party: दिवाळी पार्टीमध्ये भूमीचा बोल्डनेस पाहून चाहते हैराण

द लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द रिंग्ज ऑफ फायर

सर्वात महागड्या वेबसीरिजमध्ये या वेबसीरिजकडे पाहिले जाते. म्हणून ही वेबसीरिज निर्मित करताना पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे बोलले जात आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता तो पैसा वसूल होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वेबसीरिजमध्ये या सीरिजने दुसरा क्रमांक पटकवला आहे. या वेब सीरिजच्या बाबतीत सांगायचे तर देवदेवतांची अशी भूमी की ज्याठिकाणी मनुष्य जाऊ शकत नाही या संकल्पनेवर ही वेबसीरिज आधारित आहे.

ott platform
Ram Setu Gets Protection: अक्षय कुमारच्या राम सेतूला मिळाले संरक्षण, दिल्ली उच्च न्यायालयात जिंकली लढाई

हाउस ऑफ द ड्रॅगन

या महिन्यात प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजमध्ये या वेबसीरिजने टॉप ३ मध्ये आपला मान पटकवला आहे. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसीरिजमध्ये तिसरा नंबर लागतोय. गेम ऑफ थ्रोन या वेबसीरिजचा हा पहिला भाग आहे. या वेबसीरिजचा पहिला भाग २२ ऑगस्टला रिलीज झाला होता तर तेव्हापासूनच पुढच्या एपिसोडचे वेध लागले होते. डिज्नी प्लसवर ही सीरीज पहायला मिळत असून नवा एपिसोड दर सोमवारी प्रदर्शित केला जाणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com