New Marathi WebSeries Baby On Board  Instagram/ @planetmarathiott
मनोरंजन बातम्या

Baby On Board: नवविवाहित दाम्पत्याचे लवकरच येणार 'बेबी ऑन बोर्ड'; पहिला पोस्टर प्रदर्शित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' (Marathi Entertainment News) या सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारे पहिले बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येत असतात. मग सुरु होतो तो नऊ महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. 'बेबी ऑन बोर्ड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "बेबी ऑन बोर्ड नवीन संकल्पना असलेली सिरीज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. उत्तम दिग्दर्शक व कलाकारांची साथ लाभली. आजच्या तरुणाईला आवडेल, जवळची वाटेल, अशी ही वेबसिरीज आहे. लग्नानंतरच्या या टप्प्यात जोडीदारासोबतच कुटुंबासोबतचे बाँडिंगही पाहायला मिळेल. ही प्रेमळ, हलकी फुलकी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल."

प्रतिक्षा मुणगेकर, अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या सिरीजचे लेखन व दिग्दर्शन सागर केसकर यांचे असून साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते आहेत. तर अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. 'बेबी ऑन बोर्ड' या शीर्षकावरून आणि पोस्टरवरूनच यात काय धमाल आणि मनोरंजनात्मक किस्से असतील, याचा अंदाज येतोय. 'बेबी ऑन बोर्ड'च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नाविन्यपूर्ण सिरीज घेऊन आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phullwanti: प्राजक्ताच्या माळीच्या चित्रपटात दिसणार 'हे' कलाकार

Pune CA Death Case: सीए तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश; 'ईवाय’ कंपनीवर गंभीर आरोप

Fulora Recipe : नवरात्री स्पेशल देवीसाठी बनवा भरीवाचा फुलोरा

मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ‘ही’ कार; जबरदस्त फीचर्ससह मिळत आहे 1 लाखांची सूट, जाणून घ्या किंमत

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

SCROLL FOR NEXT