Saam Tv Instagram @vijayandalkar
मनोरंजन बातम्या

Vijay Andalkar: 'पिंकीचा विजय असो' मालिका फेम अभिनेता विजय आंदळकर झाला 'बाबा'

अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झणकर घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.

Pooja Dange

Vijay Andalkar Blessed With Baby Girl: 'पिंकीचा विजय असो' या मालिकेत युवराजची भूमिका साकारणारा अभिनेता विजय आंदळकर याने एक गोड बातमी दिली आहे. विजय बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. विजयने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. चाहते आणि कलाकार मंडळी विजयचे अभिनंदन करत आहते.

अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली झणकर या जोडप्याने काही महिन्यापूर्वी ते आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी शेअर केली होती. ही बातमी समजताच विजय आणि रुपालीवर प्रेमाचा वर्षाव चाहत्यांनी केला होता.

विजयने 'बाप झालो.... लक्ष्मी घरी आली रे! अशी पोस्ट त्याच्या इन्स्टाग्रामवर केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने डोहाळ जेवणाचे फोटो देखील त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले होते. घरी लक्ष्मी आल्याने विजय खूप आहे, असे त्याचे पोस्टवरून दिसत आहे.

विजय आणि रुपालीची भेट 'लग्नाची वाइफ आणि वेड्डिंगची बायकू' या मालिकेदरम्यान झाली होती. २१ एप्रिल २०२१ रोजी साखपुडा करत चाहत्यांना धक्का दिला होता. विजय आणि रुपालीने त्यांच्या लग्नसमारंभारतील सर्व कार्यक्रमाचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

विजयचे हे दुसरे लग्न आहे. विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पूजा पुरंदरेशी मोठ्या थाटामाटात झाले होते. २०१७ साली दोघांचा घटस्फोट झाला. पूजा आता सहकुटुंब सहपरिवार या स्टार प्रवाहवरील मालिकेत 'पूजा'ची भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festival Makeup Look: सणासुदीला खास लूक हवा असेल तर यावेळी 'हा' मेकअप लूक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवर धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

Manoj Jarange: मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली, दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर येणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

Dussehra 2025: दसऱ्याला आवर्जून करा ही ३ कामे, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

SCROLL FOR NEXT