Sharayu Sonawane Engagement Saam TV
मनोरंजन बातम्या

Sharayu Sonawane Engagement: ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Pinkicha Vijay Aso Serial: शरयूने साखरपुड्यातील रोमँटीक फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुडा केल्याची माहिती दिली.

Priya More

Sharayu Sonawane And Jayant Lade Engagement:

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'पिंकीचा विजय असो' ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे प्रेक्षकांना खूपच आवडली. काही दिवसांपूर्वी पिंकीने ही मालिका सोडून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा चाहत्यांना धक्का दिला पण हा धक्का मात्र सुखद आहे. यामागचे कारण आहे ते म्हणजे शरयू सोनावणेने गुपचूप साखरपुडा उरकला.

गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर शरयूने साखरपुडा केला आहे. अभिनेत्रीने साखरपुड्यातील रोमँटीक फोटो शेअर करत चाहत्यांना साखरपुडा केल्याची माहिती दिली. हा फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. शरयूच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. या फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शरयूने साखरपुड्याचे रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. हॅपी अ‍ॅण्ड एंगेज…गणपती बाप्पा मोरया.' शरयूच्या या फोटोंवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी दोघांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शरयू या फोटोमध्ये खूपच गोड दिसत आहे. तिने साखरपुड्यामध्ये लेहंगा परिधान केला होता. या फोटोमध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक अंदाजमध्ये दिसत आहे. शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जयंत लाडे आहे. जयंत हा फिल्ममेकर आणि निर्माता आहे. दरम्यान, शरयू सोनावणे ही पिंकीचा विजय असो या मालिकेतून घराघरामध्ये पोहचली. या मालिकेतील शरयूची पिंकी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. पण काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेला रामराम ठोकला. आता या मालिकेत पिंकीची भूमिका अभिनेत्री आरती मोरे साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT