छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'इमली'च्या (Imlie Serial) सेटवर दुर्दैवी घटना घडली आहे. या मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरु असतानाच विजेचा झटका लागल्यामुळे लाईटमनचा मृत्यू झाला. गोरेगाव फिल्मसिटीतील मालिकेच्या सेटवर ही घटना घडली. या घटनेमुळे सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकार आणि इतर टीम मेंबर्सला मोठा धक्का बसला.
स्टार प्लसवरील 'इमली'मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये म्हणजे गोरेगाव फिल्मसिटीमध्ये या मालिकेचा सेट आहे. या सेटवर शूटिंग सुरू असताना गुरुवारी वाईट घटना घडली. या मालिकेचे शूटिंग सुरू असताना लाईटमनचा विजेचा जोराचा झटका लागला. या घटनेत लाईटमन गंभीररित्या जखमी झाला.
मालिकेच्या सेटवर उपस्थित असलेल्या टीमच्या मेंबर्सनी या लाईटमनला तात्काळ रुग्णालयामध्ये उपचासाठी हलवले. पण रुग्णालयामध्ये पोहचण्यापूर्वीच रुग्णवाहिकेमध्ये त्याचा मृत्यू झाला. महेंद्र यादव असं मृत्यू झालेल्या लाईटमनचे नाव आहे. अद्याप मालिकेच्या टीमने किंवा चॅनले यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे मालिकेच्या सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांना धक्का बसला. या घटनेनंतर मालिकेचे शूटिंग काही काळ थांबवण्यात आले होते.
महेंद्र यादव हा २८ वर्षांचा तरूण गेल्या काही दिवसांपासून इमली मालिकेच्या सेटवर लाईटमनचे काम करत होता. महेंद्रला विजेचा धक्का लागण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी देखील काही दिवसांपूर्वी त्याला विजेचा धक्का लागला होता. पण सुदैवाने तो त्यावेळी वाचला होता. पण मंगळवारी मालिकेचे शूटिंग सुरू असताना त्याला पुन्हा विजेचा धक्का लागला आणि या घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.