मैत्री, स्वप्नं आणि संघर्ष यांचा संगम असलेली 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. मालिकेने आता 200 भागांचा टप्पा पार केला आहे. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वल्लरीची सासू इंदुमती पुन्हा एकदा मनोज आणि वल्लरीमध्ये फूट पडण्यासाठी थेट मुंबईत आली आहे. त्यामुळे मालिकेने आता नवीन वळण घेतले आहे.
मनोज आणि वल्लरीच्या संसाराची स्वप्नं आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच वल्लरीची सासू इंदुमती तिच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेते. "भामरेंची सून ड्रेस घालणार नाही." असं ठणकावून सांगत इंदुमती वल्लरीचे कपडे लपवणार आहेत. तर पुढे वल्लरीची सासू पिंगा गर्ल्सना चॅलेंज देते की, "एका तासात कपडे शोधा, अन्यथा वल्लरीला आयुष्यभर साडी नेसावी लागेल" आता पिंगा गर्ल्स हे चॅलेंज पार करू शकतील का? वल्लरी आपल्या इच्छांवर ठाम राहील का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीची सासू आता मनोज आणि वल्लरीकडे आली असून तिचा हेतू या दोघांमध्ये फूट पाडणे आहे. तिचा मुळातच त्यांच्या नात्याला विरोध आहे. नाते तोडण्यासाठी ती मुंबईला आली आहे. मनोजला त्याची आई नको असली तरीही वल्लरीने घातलेल्या अटीमुळे तो त्याच्या आईला घरात राहण्यास परवानगी देतो. तेव्हापासून इंदुमती वल्लरीला त्रास देण्याला सुरुवात होते.
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका संध्याकाळी 7.30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.