Hera Pheri 3 Photo Saam TV
मनोरंजन बातम्या

Photo Leaked: 'हेरा फेरी 3'च्या सेटवरील फोटो लीक; नेटकऱ्यांनी लढवले नवीन तर्क

अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचे 'हेरा फेरी 3'चे शूटिंग सुरु झाले आहे.

Saam Tv

Hera Pheri 3 Photos Leak: बॉलिवूडमधील धमाल त्रिकुट पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेता अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचे 'हेरा फेरी ३'चे शूटिंग सुरु झाले आहे. चित्रपटाच्या सेटवरील या त्रिकुटाचा फोटो लीक झाला आहे. हा लीक झालेला फोटो व्हायरल देखील होत आहे. या फोटोंमध्ये राजू, श्याम आणि बाबुराव दिसत आहेत. हे तिघेही चित्रपटातील त्यांच्या आयकॉनिक वेशभूषेत दिसत आहेत.

आपण जरी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला 'हेरा फेरी 3' म्हटले असले तरी निर्मात्यांच्या म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'हेरा फेरीचा तिसरा भाग असला तरी त्याला हेरा फेरी 3 असे म्हटले जाणार नाही. त्याऐवजी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव हेरा फेरी 4 ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांना वाटते की असे केल्यानेच कथेला न्याय मिळेल. तसेच चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यामागचे कारण समजेल असेही निर्मात्यांचे म्हणणे आहे.

सूत्रांनी पुढे सांगितले की, ''हेरा फेरी 4' अद्याप फ्लोर गेलेला नाही. काल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी एका प्रोमोसाठी शूट केले आणि ब्लॉकबस्टर कॉमेडी फ्रँचायझीचा तिसरा भागाची अधिकृत घोषणा केले तसेच चित्रपट लवकरच ऑन फ्लोअर जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर एक-दोन महिन्यांत चित्रीकरण सुरू होईल.'

प्रियदर्शन दिग्दर्शित हेरा फेरी 2000 साली प्रदर्शित झाला होता. एक गरीब घरमालक आणि त्याच्या दोन भाडेकरूंची कथा होती. या तिघांना एका चुकीच्या नंबरवरून फोन येतो आणि त्यांच्या नशिबाचे फासे पालटतात.

नीरज व्होरा दिग्दर्शित 'फिर हेरा फेरी' 2006 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भागात कथेचा पुढील भाग दाखविण्यात आला. आता हेरा फेरी 4 मध्ये दिग्दर्शक कथेचे कोणते पैलू उलघडून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार यांसाठी सगळॆच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT