Shahrukh Khan
Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Movie Controversy: 'जर मी हिंदू असतो तर...' 'पठाण' चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा व्हिडिओ व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shahrukh Khan: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट सध्या चांगलाच वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे रिलीझ झाले होते. या गाण्यावरुन या वादाला सुरूवात झाली आहे. गाण्यामधील दीपिकाच्या बिकीनीवरुन हा वाद सुरू झाला होता. या बिकीनीमुळे भगव्या रंगाचा अपमान झाला असल्याचे हिंदू संघटनांनी म्हणले होते.

इतकेच नव्हेतर मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गाण्यामध्ये बदल न केल्यास राज्यात चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. या दरम्यान शाहरुख खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो हिंदू धर्माबद्दल बोलताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये शाहरुख (Shahrukh Khan) एका मुलाखतीत बोलताना दिसत आहे. यामध्ये शाहरुखला तु एक चांगला मुस्लिम आहेस पण जर तु हिंदू असता तर म्हणजे एस. के वरुन शेखर कृष्ण असता तर तुझ्यासाठी गोष्टी वेगळ्या असत्या का? हा प्रश्न विचारताच शाहरुख शेखर कृष्ण नाही तर एस आर के वरुन शेखर राधा कृष्ण असे असेल अस उत्तर दितो.

याबद्दल पुढे बोलताना शाहरुख म्हणतो की, "जरी माझ नाव शेखर राधा कृष्ण असते तर माझ्यासाठी काही वेगळ झाल नसतं. मी आहे असाच असतो. मला नाही वाटत की कलाकारासाठी जात धर्म या गोष्टी महत्वाच्या असतात. त्याच्यामध्ये ती क्षमता असते. मला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली असती तरी मी इतकाच प्रेमाने वागलो असतो."

दरम्यान, शाहरुख खानचा हा व्हायरल व्हिडिओ जुना आहे जो पठाण चित्रपटाच्या वादानंतर व्हायरल होत आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT