Pathaan Movie Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pathaan Trailer: शाहरुखच्या 'पठान'ला मोठा झटका, जे नको होत तेचं घडलं...

'पठान' चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले होते.

Pooja Dange

Pathaan Movie Controversy: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठान' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. शाहरुख खानच्या लूकची खूप चर्चा झाली. तर चित्रपटातील दीपिका पदुकोणवर चित्रित 'बेशरम रंग' हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले. गाण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे या गाण्याला १७० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

आता 'पठान' चित्रपटाचा ट्रेलर लीक झाला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी 'पठान'च्या ट्रेलरवर कमेंट करत आहेत. परंतु निर्मात्यांनी यावर अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

'पठान' चित्रपट जाहीर होताच त्याची खूप चर्चा झाली. त्यानंतर या चित्रपटाच्या दोन्ही गाण्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. त्यावर अनेक दिवस चर्चा सुद्धा झाली. चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यामुळे चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. दीपिकाने या गाण्यात घातलेल्या बिकिनीमुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. एकटे वाद निर्माण झाल्यनंतरही चित्रपटाचे गाणे खूप हिट झाले.

'पठान' चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले होते. ट्रेलर प्रदर्शित होण्यापुर्वीच ऑनलाईन लीक झाला आहे. अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

यशराज फिल्म्स निर्मित आणि सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान' चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ट्रेलर प्रदर्शित करण्याचीही तयारी सुरु आहे. त्यातच ट्रेलर लीक झाल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.

शाहरुख, दीपिका आणि जॉन अब्राहाम यांचा 'पठान' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटप्रेमी खूप उत्सुक आहेत. शाहरुख या चित्रपटाच्या माध्यमातून ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

SCROLL FOR NEXT