Pathan Box Office Collection Day 19  Saam TV
मनोरंजन बातम्या

Pathaan box office Day 19: 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर डंका कायम, सलग तिसऱ्या आठवड्यातही कमाईत अव्वल

'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले असून चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करणं कायम ठेवले आहे.

Chetan Bodke

Pathaan box office Day 19 Collection: 'पठान' चित्रपट प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले असून चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक करणं कायम ठेवले आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, स्पाय थ्रिलर चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा आहे. तिसर्‍या विकेंडमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर रविवारी 12.50 कोटी रुपयांची कमाई केली, अशी माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने दिली आहे.

'पठान' चित्रपटाने हिंदी भाषेत ४६९ कोटींची कमाई झाली होती. तर, इतर भाषेत चित्रपटाने ४८६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठान'सध्या अनेक चित्रपटांनी केलेल्या चित्रपटांची कमाई ब्रेक करीत आहे. 'बाहुबली २'च्या हिंदी भाषेतील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५११ कोटींचा गल्ला जमावला होता.'पठान' चित्रपटाने जर अशी रेकॉर्डब्रेक कमाई केली तर, 'पठान' बॉलिवूडमधील ५०० कोटींच्या क्लबमधील तो पहिला चित्रपट असेल.

पण मुख्य बाब म्हणजे, 'पठान'ने वर्ल्ड वाईड अनेक रेकॉर्ड मोडत ९२४ कोटींचा गल्ला जमावला आहे. 'पिंकव्हिला'ने शेअर केलेल्या माहितीप्रमाणे, रविवारी चित्रपटाने वर्ल्ड वाईड ९५० कोटींची कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे. येत्या आठवड्यात म्हणजेच, चौथ्या आठवड्यात चित्रपट दिलासादायक कामगिरी करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

येत्या चौथ्या आठवड्यात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. येत्या शुक्रवारी, कार्तिक आर्यनचा शेहजादा, मार्वलचा अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमनिया, अक्षय कुमारचा सेल्फी, रणबीर कपूर- श्रद्धा कपूरचा तू झुटी मैं मक्का आणि तब्बू- अजयचा भोला हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. आता या सर्वांसमोर शाहरुखचा 'पठान' किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT