Parineeti Chopra Baby Name SAAM TV
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Baby Name : परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढाच्या लेकाचं बारसं, नावाचा अर्थ सांगत शेअर केला फोटो

Parineeti Chopra-Raghav Chadha Baby Name Ceremony : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने बाळाचे बारसं केले आहे. राघव आणि परिणीतीच्या लेकाचे नाव जाणून घेऊयात.

Shreya Maskar

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुलगा झाला.

नुकतेच परिणीती आणि राघवने लेकाचे बारसं केले आहे.

परिणीतीने लेकाची पहिली झलक दाखवली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने गेल्या महिन्यात 19 ऑक्टोबरला गोंडस मुलाला जन्म दिला. परिणीती आणि राघव चड्ढा आई-बाबा झाले. चाहते त्यांच्या बाळाला पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. अशात आता परिणीती चोप्राचे आपल्या लेकाची पहिली झलक दाखवली आहे. तसेच त्यांनी आपल्या मुलांचे बारसं केले आहे. परिणीती आणि राघवने मुलाचे नाव खूपच युनिक ठेवले आहे.

परिणीती-राघवने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी बाळासोबत दोन फोटो शेअर करून त्याचे नाव सांगितले आहे. तसेच परिणीतीच्या मुलाच्या नावाचा अर्थ नावासारखा खूप खास आहे. पहिल्या फोटोमध्ये बाळाचे पाय दिसत आहेत. ज्याला परिणीती-राघव प्रेमाने किस करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये बाळाचे पाय आणि परिणीती-राघवचे हात दिसत आहे. एक सुखी कुटुंबाचे चित्र पाहायला मिळत आहे.

नाव आणि अर्थ

परिणीती-राघवच्या मुलाचे नाव 'नीर' (Neer) असे आहे. या नावाचा अर्थ परिणीतीने कॅप्शनमध्ये सांगितला आहे. तिने लिहिलं की, "जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् - तत्र एव नीर..." 'नीर' या शब्दाचा अर्थ शुद्ध, दिव्य, अमर्याद असा आहे. परिणीती-राघवच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लग्नगाठ

बाळाच्या जन्मानंतर एका महिन्याने म्हणजे (19 नोव्हेंबर) ला परिणीती-राघवने बाळाची पहिली झलक दाखवली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 24 सप्टेंबर 2023 ला झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी हे कपल आई-बाबा झाले. परिणीती चोप्राला 'इशकजादे' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिचे शुद्ध देसी रोमान्स, हसी तो फसी,दावत ए इश्क आणि अमर सिंह चमकीला असे अनेक चित्रपट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro 8: मुंबई ते नवी मुंबई फक्त 35 मिनिटांत, मेट्रोचा नवा मार्ग कसा असेल? किती स्थानके ? वाचा सविस्तर

Chanakya Niti: हुशार लोक कोणालाच सांगत नाहीत या ५ गुणांबद्दल, वाचा सक्सेस मिळवण्याचे सिक्रेट

Vidula Chougule: 'बॉईज 3' फेम विदुला चौगुलेचं सुंदर सौंदर्य, डोळ्यांनी सारं काही समजलंय...

Healthy Oats Recipes : ओट्स पासून बनवा या ६ हेल्दि आणि टेस्टी डिशेस

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

SCROLL FOR NEXT