Famous Director Death : प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन, ५३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous Director Passes Away : मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वयाच्या 53 वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Famous Director Passes Away
Famous Director DeathSAAM TV
Published On
Summary

मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे.

वयाच्या 53 वर्षी दिग्दर्शकाने अखेरचा श्वास घेतला आहे.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले आहे. अ‍ॅनिमे दिग्दर्शक तात्सुया नागामाइन (Tatsuya Nagamine) यांनी वयाच्या 53 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. तात्सुया नागामाइन त्यांच्या वन-पीस फिल्म- झेड, ड्रॅगन बॉल सुपर: ब्रॉली आणि द वानो आर्क त्यांसाठी प्रसिद्ध आहेत. तात्सुयाचे चाहते त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत.

जगभरातील लोकांना आवडणारे प्रतिष्ठित शो आणि चित्रपटांद्वारे त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्ट करून याची अधिकृत माहिती दिली आहे. तात्सुया नागामाइन यांचे निधन 20 ऑगस्टला झाले आहे. 13 नोव्हेंबर रोजी दिग्दर्शकावर श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्यात पटकथा लेखक रयोता यामागुची यांच्यासह उद्योगाती आणि अनेक मोठ्या लोकांनी उपस्थिती लावली होती.

कुटुंबाच्या अधिकृत पोस्टमध्ये असे लिहिले आहे, "तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आम्ही तात्सुया नागामाइनचे कुटुंब आहोत. गेल्या वर्षापासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. परंतु 20 ऑगस्ट रोजी वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. तात्सुया खूप दयाळू, प्रेमळ आणि काळजी घेणारा होता. ते जगातील सर्वोत्तम वडील आणि पती होते. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनाने उपचार सुरू ठेवले आणि शक्य तितके कठोर परिश्रम केले. ते आजाराशी लढत होते कारण त्यांनी घरी परतायचे होते. तसेच त्यांना काम करायचे होते. "

पोस्टमध्ये पुढे म्हटले की, "आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्हाला त्यांच्या कामाचा अभिमान आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही मनापासून आभार मानतो. जर तुम्ही त्यांनी दिलेल्या कामांचा आनंद घेत राहिलात आणि त्यांचे कौतुक करत राहिलात तर आम्ही आभारी राहू."

Famous Director Passes Away
De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com