Parineeti Raghav Engagement Date Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Raghav Engagement Date: अखेर ठरलं! राघव- परिणीती करणार साखरपुडा; तारीखही आली समोर...

चाहते परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

Chetan Bodke

Parineeti Raghav Engagement Date: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत आहे. अनेकदा हे दोघेही एकत्र मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर स्पाॅट देखील झाले होते. मध्यंतरी त्यांचा साखरपुडा आटोपला असल्याच्या अनेकदा चर्चा देखील झाल्या होत्या. चाहते परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, परिणीती आणि राघव १३ मे रोजी साखरपुडा करणार आहेत. त्यांचा साखरपुडा नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. परी आणि राघव हे दोघेही होणाऱ्या चर्चांवर काहीच बोलत नव्हते. अनेकदा सोशल मीडियावर त्या दोघांचेही एकत्र फोटो व्हायरल झाले होते. अनेकदा परिणीतीला पापाराझींनी त्यांच्या रिलेशनवर प्रश्न विचारले होते. ती माध्यमांसमोर त्यांच्या प्रश्नांना टाळण्याचा प्रयत्न करते पण तिच्या चेहेऱ्यावरील स्मितहास्यच सर्व काही उत्तर देऊन जात होते.

अनेकदा सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आहे. १० एप्रिलला ते दिल्लीत साखरपुडा करणार असल्याच्या चर्चा देखील अनेकदा झाल्या होत्या. मध्यंतरी, परिणीती आणि राघवचा रोका सेरेमनी पार पडली असून ते यावर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी देखील अनेकदा चर्चा झाली.

परिणीतीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, परिणीती अखेरची उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्यासोबत अखेरची दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड - गेवराईमध्ये घर जळून खाक, कुटुंब देवदर्शनाला गेल्याने जीवितहानी टळली

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ४ धडाडीचे निर्णय

IPPB Jobs : पोस्टात बक्कळ पगाराची नोकरी, पण अट फक्त एकच; पाहा कुणाला करता येणार अर्ज

Famous Actor Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेता हरपला; मनोरंजन विश्वावर शोककळा

Lohagad Fort : सह्याद्रीतील लोखंडी किल्ला! लोहगड किल्ल्याच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT