Hema Malini-Dharmendra Wedding Anniversary: बसंती - विरुच्या लग्नाला ४३ वर्ष पूर्ण...! हेमा मालिनीने केली रोमँटीक पोस्ट

Hema Malini Special Post: हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
Hema Malini Special Post
Hema Malini Special PostTwitter @dreamgirlhema
Published On

Hema Malini Share Romantic Post For Dharmendra: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या लग्नाला आज ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. 1980 मध्ये याच दिवशी सिनेसृष्टीतील या दोन दिग्गज कलाकारांचे लग्न झाले होते. या खास दिवशी हेमा मालिनी यांनी ट्विटरवर धर्मेंद्रसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

'तुम हसीन मैं जवान' चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली मैत्री आणि त्यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यासोबतचा विवाह असा 43 वर्षांचा प्रवास अनेक अविस्मरणीय क्षणांसह सुरू आहे. हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वाढदिवसादिनानिमित्त धर्मेंद्रसोबतचे अनेक संस्मरणीय आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. (Latest Entertainment News)

Hema Malini Special Post
Bhojpuri Actress Father Passed Away: भोजपुरी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर

पहिल्या ट्विटमध्ये हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबतचा त्यांचा सहवास हा अतिशय असल्याचे सांगत त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले आहे आणि भविष्यातही हा प्रवास सुरूच राहणार असल्याचे सांगितले. यासोबत हेमा मालिनी यांची त्यांचे काही वर्षांचे फोटो शेअर केले. रील स्क्रीनप्रमाणे रियलमध्ये देखील हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ही जोडी अप्रतिम दिसत आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र एकमेकांच्या प्रेमात पडले, परंतु त्यांना लग्न करणे सोपे नव्हते कारण धर्मेंद्र यांचा विवाह झाला होता आणि त्यांना मुले होती. धर्मेंद्र यांना पत्नीला घटस्फोट देखील द्यायचा नव्हता. अशा परिस्थितीत धर्मेंद्र यांनी एक मोठे पाऊल उचलला. धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. धर्मेंद्रचे नाव दिलावर आणि हेमा यांचे नाव आयशा बी झाले आणि दोघांनी लग्न केले.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना लग्नानंतर ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली झाल्या. याआधी धर्मेंद्रला त्याच्या पहिल्या लग्नापासून चार मुले होती, सनी देओल, बॉबी देओल, विजेता आणि अजिता अशी त्यांच्या चार मुलांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com