Paresh Rawal SAAM TV
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal : 'बाबुराव'ची 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट, परेश रावल यांनी व्याजासकट परत केले पैसे

Paresh Rawal-Hera Pheri 3 : बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून एक्झिट घेतली आहे. तसेच त्यांनी मेकर्सला व्याजासकट पैसे देखील परत केले आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3 ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या चित्रपटातून परेश रावल यांची एक्झिट झाली आहे. त्यांनी 'बाबुराव' या भूमिकेचा निरोप घेतला आहे. त्यामुळे परेश रावल यांनी मेकर्सला सिनेमाची साइनिंग अमाऊंट व्याजसह परत दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल यांना 'हेरा फेरी 3' चित्रपटासाठी 15 कोटी रुपये मानधन मिळणार होतं. तेव्हा त्यांना 11 लाख रुपयांची स्वाक्षरी रक्कम मिळाली. उर्वरित १४ कोटी ८९ लाख त्यांना सिनेमा रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर मिळणार होते. 'हेरा फेरी 3' 2027 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र हे परेश रावल यांना मान्य नव्हते. आता त्यांनी निर्मात्यांना 15% व्याजासह 11 लाख रुपये परत केले आहेत.

परेश रावल एका मिडिया मुलाखतीत म्हणाले होते की, "माझी 'हेरा फेरी' मधील भूमिका 'गले का फंदा' आहे. मला बाबू भैय्या या पात्रापासून मुक्ती हवी आहे." तेव्हा पासून ते चित्रपटात दिसणार नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता 'हेरा फेरी 3' मध्ये आता 'बाबुराव'ची भूमिका कोण करणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांचे नाव चर्चेत आहे.

परेश रावल ट्विट

परेश रावल यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिलं की, "माझे वकील अमित नाईक यांनी माझ्या कायदेशीर निलंबनाबद्दल आणि बाहेर पडण्याबद्दल योग्य उत्तर पाठवले आहे. त्यांनी माझे उत्तर वाचल्यानंतर सर्व मुद्दे निकाली निघतील." आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

'हेरा फेरी 3' हा चित्रपट 'हेरा फेरी' फॅन्चायजीचा तिसरा भाग आहे. 'हेरा फेरी' चित्रपट 2000 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 2006ला 'फिर हेरा फेरी' चित्रपट रिलीज करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, 'हेरा फेरी 3' नवीन वर्षात 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते 'हेरा फेरी 3' साठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT