Pankaj Tripathi News saam tv
मनोरंजन बातम्या

Pankaj Tripathi Mother Death : प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; 89 व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

Pankaj Tripathi News : प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना मातृशोक झाला. त्यांच्या आईने ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Vishal Gangurde

पंकज त्रिपाठी यांच्या मातोश्री हेमवंती देवी यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन

त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या

त्यांच्या आईने झोपेतच अखेरचा श्वास घेतला.

अंत्यसंस्कार बेलसंड गावात कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडले.

बॉलिवूडमधून दु:खद घटना समोर आली आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मातोश्री हेमवंती देवी यांचं ८९ व्या वर्षी निधन झालं. हेमवंती देवी यांच्या निधनाची वार्ता ही अभिनेता त्रिपाठी यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.

पंकज त्रिपाठी यांच्या आईचं ३१ ऑक्टोबर रोजी बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावात वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हेमवंती देवी या आजारी होत्या. त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

पंकज त्रिपाठी आता त्यांच्या मूळ गावी आहेत. आईच्या शेवटच्या काळात सोबत होते. अभिनेते पंकज यांच्या टीमने सांगितलं की, 'त्या ८९ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या कुटुंबासोबत राहत असताना झोपेतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हेमवंती यांच्या निधनाने त्रिपाठी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण काळात त्रिपाठी कुटुंबाने हेमवंती देवी यांना विचार आणि प्रार्थनेत स्मरण करावं, अशी विनंती केली आहे.

टीमने पुढे सांगितले की, 'या कठीण काळात माध्यम आणि जनतेला त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले आहे. यावेळी त्यांनी कुटुंबाला शांततेत शोक करण्यास वेळ देण्यास सांगितलं आहे. पंकज त्रिपाठी यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यसाठी १ नोव्हेंबर रोजी बेलसँड येथे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित झाले आहेत. पंकज त्रिपाठी यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये आईवर भाष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Bigg Boss 19 Winner : 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार? 'हा' स्पर्धक आघाडीवर

PM किसान योजनेतून धाराशिवचे २५८८ शेतकरी वगळले, कारण आले समोर

प्रवाशांसाठी खूशखबर! टोल भरण्याची आता गरजच नाही, टोल प्लाझापासून किती दूर राहिल्यास मिळते सूट?

Accident : पुण्यात मोठी दुर्घटना! एमआयडीसीची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT