मनोरंजन बातम्या

Pankaja Munde: प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पंकजा मुंडेंची पोस्ट, म्हणाल्या; पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना...

Pankaja Munde Supports To Prajakta Mali: अनेकांनी प्राजक्ताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. भाजपाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ता माळीचं समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे.

Manasvi Choudhary

शनिवारी बीड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर टिपणी करत असताना प्राजक्ता माळीचे नाव मधे घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यासंदर्भात प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्राजक्ताने तीव्र संताप व्यक्त करत सुरेश धस यांच्यासारखे राजकारणी महिलांच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवत आहेत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली तर राजकरणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या सुरेश धस यांनी माझी माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

प्राजक्ता माळींच्या या पत्रकार परिषदेनंतर गेल्या दोन दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांनी प्राजक्ताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. अशातच आता भाजपाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्राजक्ता माळीचं समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे.

पंकजा मुडेंनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, 'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft target आहे स्त्री आणि तिचे सत्व..काल पाहवलं नाही ,पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी.Be strong n make us proud you all women”, असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT