Anchal Tiwari  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anchal Tiwari: मी जिवंत आहे..., मृत्यूच्या अफवेनंतर 'पंचायत २'च्या आंचल तिवारीचा VIDEO व्हायरल

Panchayat 2 Fame Anchal Tiwari: या अपघातानंतर 'पंचायत २' (Panchayat 2) अभिनेत्री आंचल तिवारीचे निधन झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. भोजपूरी अभिनेत्री आंचल तिवारीऐवजी (Anchal Tiwari) 'पंचायत २' अभिनेत्रीचाच मृत्यू झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

Priya More

Anchal Tiwari Video:

भोजपुरी मनोरंजनसृष्टीतून (Bhojpuri Film Industry) मंगळवारी एक दु:खद बातमी समोर आली होती. भीषण रस्ते अपघातामध्ये भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी, भोजपुरी गायक छोटू पांडे, अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. नवोदित कलाकारांचा मृत्यू झाल्यामुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. या अपघातामध्ये एकूण ९ जणांचा मृत्यू झाला.

या अपघातानंतर 'पंचायत २' (Panchayat 2) अभिनेत्री आंचल तिवारीचे निधन झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. भोजपूरी अभिनेत्री आंचल तिवारीऐवजी (Anchal Tiwari) 'पंचायत २' अभिनेत्रीचाच मृत्यू झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता आंचल तिवारीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे सांगितले आहे.

आंचल तिवारीने 'पंचायत सीझन 2' मध्ये प्रधानजींच्या मुलीच्या बेस्ट फ्रेंडची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजमुळेच आंचल तिवारी चर्चेत आली होती. आता तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र आंचलने स्वत: पुढे येऊन तिच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन केले असून असे माझ्यासोबत असं काहीही झाले नसल्याचे सांगितले आहे. मी एकदम सुरक्षित आहे. मरण पावलेली आंचल तिवारी ही भोजपुरी अभिनेत्री होती, असेही तिने स्पष्ट केले आहे.

आंचल तिवारीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आंचल तिवारीने आपल्या मृत्यूबाबत चुकीची माहिती पसरवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे. तसेच, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने या प्रकरणाबद्दल बोलताना एक भलीमोठी पोस्ट देखील लिहिली आहे आणि 'मी जिवंत आहे' असे म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये आंचल तिवारीने लिहिले की, 'हॅलो, माझं नाव आंचल तिवारी आहे. काल तुम्ही न्यूज पाहिली असेल की पंचायत फेम आंचल तिवारीचे निधन झाले. ती आंचल तिवारी वेगळीआहे. ती भोजपुरी अभिनेत्री आहे. पंचायत 2 ची आंचल तिवारी मी आहे. सुरक्षित आणि व्यवस्थित आहे. ही पूर्णपणे फेक न्यूज आहे. माझा भोजपुरी सिनेमाशी काहीही संबंध नाही. मी हिंदी सिनेमा करते. मी हिंदी रंगभूमी केली आहे. त्यामुळे कृपया माझी भोजपुरीशी तुलना करू नका. या फेक न्यूजमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागला. काही लोकांनी माझी तुलना पूनम पांडेशी केली आहे. मी पब्लिसिटी स्टंट केला असे म्हटले जात होते. पण असे काहीही नाही आहे. त्यामुळे या न्यूज खोट्या आहेत त्या काढून टाका.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Sawant : मोठे साम्राज्य वाचविण्यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत जातात; काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा कुणाल पाटील यांच्यावर निशाणा

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT