Jitendra Kumar Panchayat Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jitendra Kumar Net Worth : साधं सिंपल राहणीमान आणि चार महागड्या मर्सिडीज; ‘पंचायत ३’ च्या ‘सचिवजी’ची संपत्ती पाहिलीत का ?

jitendra kumar panchayat net worth : सध्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. सीरीजमध्ये जितेंद्रने मुख्य भूमिका साकारली असून आज आपण त्यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

Chetan Bodke

सध्या अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये या सीरीजची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. वेबसीरीजप्रमाणे त्यातील कलाकारही कमालीचे चर्चेत असतात. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असलेले सचिवजी अभिषेक कुमार त्रिपाठी म्हणजेच जितेंद्र कुमार हे सध्या प्रचंड चर्चेत राहिलेलं पात्र आहे. या सीरीजमध्ये जितेंद्रने मुख्य भूमिका साकारली असून आज आपण त्यांच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

जितेंद्र कुमार हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून त्याने ओटीटीवर दमदार कामगिरी करत प्रसिद्धी मिळवली आहे. तो मुंबईमध्ये राहत असून त्याच्या सिंपलनेसने सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. फर्निचर, चित्रपटांचे पोस्टर्स आणि हटक्या डिझाईन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो अनेकदा इन्स्टाग्रामवर घरातील फोटोज् शेअर करत असतो. मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्र कुमारकडे महागड्या अलिशान कार्स आहेत.

जितेंद्रकडे Mercedes Benz GLS 350 D 88.18 लाखांची, Mercedes Benz E Class 82.10 लाखांची, Toyota Fortuner 48.43 लाखांची आणि Mini Countryman 42 लाखांची गाडी त्याजवळ आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जितेंद्रची एकूण संपत्ती तब्बल ७ कोटींच्या आसपास आहे. याशिवाय तो ब्रँड अँडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उत्तम कमाई करतो. त्याचे अनेक ब्रँडसोबत टायअप आहे. त्याने 'पंचायत'च्या एका एपिसोडसाठी ७० हजार रुपये इतके मानधन घेतले.

'पंचायत ३' वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत जितेंद्र कुमारसह नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैजल मल्लिक, चंदन रॉय, सान्विका सह अनेक स्टारकास्ट या सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. ही सीरीज मल्टीस्टारर आहे. जितेंद्र कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच अभिनेता 'कोटा फॅक्टरी ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: 'या' ५ सवयी अंगीकारा आणि जीवनात मिळवा मोठे यश

Bank Jobs: इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, ७५० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Suyash Tilak : मराठमोळ्या अभिनेत्याच्या गाडीचा अपघात; तासाभराने मिळाली मदत, पाहा VIDEO

Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT