Panchayat Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Panchayat Actor : 'पंचायत' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, वाचा हेल्थ अपडेट

Aasif Khan Health Update : 'पंचायत' फेम अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याचे हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या 'पंचायत' (Panchayat ) वेब सीरिज प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता 'पंचायत'चा चौथ्या सीझन आहे. या वेब सीरिजच्या तिन्ही सीझनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज पाहायला मिळते. या वेब सीरिजमधील कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

अशात आता 'पंचायत' वेब सीरिजच्या एका अभिनेत्याची प्रकृती बिघडली आहे. याचे अपडेट समोर आले आहेत. अभिनेत्याना आपल्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली आहे. 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानला (Aasif Khan) दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. मीडिया रिपोर्टनुसार, आता त्याची तब्येत स्थिर आहे. लवकरच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. सध्या तो मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे.

आसिफ खानने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून एक भावुक पोस्ट लिहिली आहे. "आयुष्य खूप लहान आहे. आपला प्रत्येक दिवस अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण जगा आणि आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा" या आशयाची पोस्ट आसिफने केली आहे. सध्या आसिफ खानच्या चाहते त्याची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

Aasif Khan

वर्कफ्रंट

'पंचायत' वेब सीरिजसोबत आसिफ खानने 'पाताल लोक' या सीरिजमध्ये देखील काम केले आहे. तसेच त्याने 'द भूतनी' चित्रपटात काम केले आहेत. 2024 मध्ये रिलीज झालेल्या 'काकुडा' या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. यात तो रितेश देशमुख आणि सोनाक्षी सिन्हा सोबत झळकला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT