Atif Aslam Honours Lata Mangeshkar Instagram
मनोरंजन बातम्या

Atif Aslam Viral Video : आतिफ अस्लमने भर कॉन्सर्टमध्ये लतादीदींना दिली सुरेल आदरांजली, पाहा Video

Atif Aslam Honours Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं गात पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे.

Chetan Bodke

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या गाण्याची भुरळ फक्त देशातच नाही तर जगभरात कायम आहे. आज त्या आपल्या नाहीत, पण त्या आजही आपल्या गाण्यांच्या माध्यमातून मनात कायम जीवंत आहेत. लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा है' हे गाणं लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हे गाणं गात पाकिस्तानी गायकाने लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली आहे. अबू धाबीमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम याने आदरांजली दिली आहे.

फिल्मीग्यान ह्या इन्स्टाग्राम पेजवर या कॉन्सर्ट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. या व्हिडीओमध्ये, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम हा स्टेजवर लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे सुपरहिट गाणं गाताना दिसत आहे. अबू धाबी मधल्या एका कॉन्सर्टमध्ये हे गाणं गात आतिफने लता मंगेशकर यांना स्वरमयी आदरांजली वाहिली. कॉन्सर्टवेळी आतिफ अस्लम गात असताना स्क्रिनवर मंगेशकर यांचा फोटो दिसत आहे. आतिफ अस्लमच्या कॉन्सर्टचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

१९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'शोर' चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्याला मुकेश आणि लता मंगेशकर यांनी आवाज दिलेला आहे. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे आहे. हे गाणं जवळपास आठ दशकांच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय गाण्यांपैकी एक आहे. लतादीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तर २० पेक्षा जास्त प्रादेशिक भाषांमध्ये गाणे गायले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT