Aishwarya Rai Dragged Into Pakistani Cleric’s Bold Marriage Claim Saam
मनोरंजन बातम्या

'ऐश्वर्या राय मला लग्नाचा प्रस्ताव पाठवेल, मी तिचं मुस्लिम नाव..'; पाकिस्तानचा धर्मगुरू बरळला | VIDEO

Aishwarya Rai Dragged Into Pakistani Cleric’s Bold Marriage Claim: पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती कावी यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल लग्नाचा दावा केला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Bhagyashree Kamble

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन अनेक कारणांमुळे चर्चेत असते. ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दूल कावी यांच्यामुळे चर्चेत आली आहे. पाकिस्तानी धर्मगुरू मुफ्ती अब्दूल कावी यांचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनला तीन ते चार महिन्यांत प्रपोज करणार असल्याचं सांगितलं. धर्मगुरूंनी असेही म्हटलं की, ऐश्वर्या रायला आधी इस्लाम धर्म स्वीकारायला सांगेन, नंतर तिच्याशी लग्न करेल. त्यांनी ऐश्वर्या राय बच्चनसाठी एक मुस्लिम नावाचाही विचार केला आहे.

एका पॉडकास्ट व्हिडिओमध्ये मुफ्ती कावी म्हणतात, 'ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यातील संबंध बिघडत चालले आहेत. हे कपल जर वेगळे झाले तर, ऐश्वर्या राय मला लग्नासाठी मेसेज करेल', असा दावा त्यांनी केला. कावी म्हणाले, ' मी ऐकले आहे. पती- पत्नी (अभिषेक - ऐश्वर्या राय) वेगळे होण्याची शक्यता आहे. देव करो असं होऊ नये. पण जर असं झाल्यास, २ ते ४ महिन्यांत ऐश्वर्याकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो', असं पाकिस्तानचे धर्मगुरू म्हणाले.

ऐश्वर्यासाठी मुस्लिम नाव सुचवले

पॉडकास्टमध्ये होस्टने मुफ्ती कावी यांना विचारले की, ते बिगर मु्स्लिम व्यक्तीशी कसे लग्न करतील? तेव्हा त्यांनी राखी सावंतचा उल्लेख केला. तेव्हा त्यांनी तिचे नाव फातिमा असल्याचं सांगितलं. त्यांनी पुढे सांगितले की, 'ऐश्वर्या राय आधी मुस्लिम धर्म स्वीकारतील. नंतर तिच्याशी लग्न करेन', असं मुफ्ती कावी म्हणाले.

'ऐश्वर्या रायचे नाव मी आधी बदलेन. ऐश्वर्या रायचे नाव आयेशा राय करू, मग निकाह करणार', असंही मुफ्ती कावी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मुंबईत धावत्या ट्रेनमधून २ तरुण पडले, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

Face Care: हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने होतात हे फायदे; आठवडाभर नक्की करा ट्राय

Vange Batata Bhaji: लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी झणझणीत वांगा बटाटा भाजी घरी कशी बनवायची?

तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी TEN x YOU चा पुढाकार; U-19 कर्णधार आयुष म्हात्रेसोबत केली भागीदारी

SCROLL FOR NEXT