Abir Gulal Ban In India Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abir Gulaal: पाकिस्तानचा रिव्हर्स अटॅक; बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

Abir Gulaal Movie Banned: फवाद खान आणि वाणी कपूर यांना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटावर पाकिस्तानमध्येही बंदी घालण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Abir Gulaal: 'अबीर गुलाल' हा फवाद खान आणि वाणी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा, ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने या सिनेमावर बंदी घातली. या निर्णयानंतर पाकिस्ताननेही बॉलिवूडची अभिनेत्री म्हणून या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

'अबीर गुलाल' या सिनेमाचे चित्रीकरण लंडनमध्ये ४० दिवसांच्या कालावधीत पूर्ण झाले होते. या सिनेमात फवाद खान एका यूकेस्थित शेफची भूमिका साकारत असून, वाणी कपूर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल आणि परमीत सौठी यांच्याही महत्वाच्या भूमिका समावेश आहे. आरती एस. बागदीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. ​

फवाद खान अभिनित 'अबीर गुलाल' या चित्रपटाला सुरुवातीपासूनच भारतात विरोध होत होता. १ एप्रिलला सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी अभिनेत्याचा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असे जाहीर केले होते . त्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'अबीर गुलाल'वर भारताने बंदी आणली. तसेच या चित्रपटातील गाणीही युट्यूवरून काढून टाकण्यात आली होती.

भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर, 'अबीर गुलाल' सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली. पाकिस्तानानेही या चित्रपटात वाणी कपूरची भूमिका असल्यामुळे या सिनेमावर बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा युनेस्को यादीत समावेश

Maharashtra Tourism : समुद्रकिनारी भक्तीचा संगम, महाराष्ट्रातील ५ प्रसिद्ध मंदिरे

Dilip Joshi : 45 दिवसांत 16 किलो वजन घटवलं, वाचा जेठालालचा फिटनेस फंडा

Crime: समृद्धी महामार्गावर गोळीबाराचा थरार, मित्राला बंदूक दाखवताना गोळी सुटली अन्...; घटनेचा थरारक CCTV

संतापजनक! पंढरपूरहून निघालेली एसटी बस दारूच्या नशेत चालवली, ३७ जणांचा जीव धोक्यात, चालक अन् वाहकावर कारवाई

SCROLL FOR NEXT