Navin Prabhakar Theater Saam Tv
मनोरंजन बातम्या

Navin Prabhakar: स्टँडअप कॉमेडियन नवीन प्रभाकर करतोय रंगभूमीवर पदार्पण; लवकरच करणार पहिल्या प्रयोगाची घोषणा

Navin Prabhakar News: ‘पैचान कोन’ फेम नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navin Prabhakar Theater: अनेक चित्रपट, टीव्ही कार्यक्रमांतून ओळख निर्माण केलेला स्टँडअप कॉमेडियन, अभिनेता ‘पैचान कोन’ फेम नवीन प्रभाकर आता रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज आहे. ‘कॉमेडी नाइट्स’ या कार्यक्रमातून नवीन प्रभाकर पहिल्यांदाच रंगभूमीवर येत असून, पहिल्या प्रयोगाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

अनेक चित्रपटांची निर्मिती, प्रस्तुती केलेल्या स्वरुप स्टुडिओजच्या प्रभाकर परब, सचिन नारकर, विकास पवार आणि प्रतिक मेहता यांनी ‘कॉमेडी नाइट्स’ची निर्मिती केली आहे. नवीन प्रभाकरसह या कार्यक्रमात राजकुमार रँचो आणि नितीन भंडारकर यांचाही सहभाग आहे.

नवीन प्रभाकरने आतापर्यंत स्टँडअप कॉमेडीचे तीन हजारहून अधिक कॉर्पोरेट शोज केले आहेत. त्यातून त्याने स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळेच आता रंगभूमीवर येत असलेल्या नवीन प्रभाकरच्या कॉमेडी नाइट्स कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

नवीन प्रभाकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘पैचान कोन’ या मालिकेच्या माध्यमातून हा अभिनेता सर्वाधिक प्रकाशझोतात आला असून त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारली. नवीन प्रभाकरने तान्हाजी: द अनसंग वॉरियर, फटा पोस्टर निकला हिरो, खिलाडी ७८६ सह आपडी थापडी, रघुवीर या मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. लवकरच नवीन प्रभाकर ‘कॉमेडी नाइट्स’ या कार्यक्रमातून नवीन प्रभाकर पहिल्यांदाच रंगभूमीवर येत असून, पहिल्या प्रयोगाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT