Web Series, Films On OTT, Salaar, kubra, Films webseries, Netflix amazon prime video, disney hotstar SAAM TV
मनोरंजन बातम्या

New Web Series : अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्स; वीकेंडला OTT वर मनोरंजनाचा तडका, पाहा १० नवीन चित्रपट-वेबसीरीज

Web Series And Films On OTT : अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा तडका या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जानेवारीतल्या या वीकेंडला सस्पेन्स आणि रोमान्स असलेले अनेक नवीन चित्रपट आणि वेबसीरीज रीलीज झाल्या आहेत.

Nandkumar Joshi

Films - Web Series OTT Release on Weekend :

अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा तडका या आठवड्यात ओटीटी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जानेवारीतल्या या वीकेंडला सस्पेन्स आणि रोमान्स असलेले अनेक नवीन चित्रपट आणि वेबसीरीज रीलीज झाल्या आहेत. त्यामुळं हा वीकेंड सिनेमाप्रेमींसाठी भरपूर मनोरंजनाचा असणार आहे.

ओटीटीवर हॉलीवूड चित्रपट आणि कोरियन ड्रामा देखील बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यात अभिनेता प्रभासचा सालार हा चित्रपटही ओटीटीवर धडकतोय. (Bollywood News)

इंडियन पुलिस फोर्स

रोहित शेट्ट याची वेबसीरीज इंडियन पुलिस फोर्स या आठवड्यात ओटीटीवर रीलीज झाली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय ही तगडी स्टारकास्ट असलेली सीरीज १९ जानेवारीला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रीलीज झाली आहे. रोहित शेट्टीने या सीरीजच्या माध्यमातून डिजिटल डेब्यू केला आहे.  (Bollywood)

सिक्स्टी मिनट्स

अॅक्शन पॅक्ड चित्रपट सिस्क्टी मिनट्स देखील १९ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रीलीज झाला आहे. हा जर्मन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

सालार

प्रशांत नील यांचा अॅक्शन चित्रपट सालार हा सुपरहिट ठरलाय. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्यानंतर आता प्रभासचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रीलीज झाला आहे.

किलर सूप

मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा यांची किलर सूप ही सीरीज ११ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरीजला प्रेक्षकांकडून तगडा प्रतिसाद मिळत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

द लीजेंड ऑफ हनुमान

अॅनिमेटेड सीरीज 'द लीजेंड ऑफ हनुमान' चा तिसरा सीझनही ओटीटीवर आला आहे. १२ जानेवारीला प्रदर्शित झालेली ही सीरीज डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघू शकता.

कुबरा

तुर्की ड्रामा थ्रिलर 'कुबरा' देखील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली आहे.

ए शॉप फॉर किलर्स

कोरियन ड्रामा ए शॉप फॉर किलर्स देखील ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर बघू शकता. हा अॅक्शन पट आहे. अॅक्शन चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होईल.

द बीक्वेथेड

ए शॉप फॉर किलर्ससह याच आठवड्यात आणखी एक कोरियन ड्रामा द बीक्वेथेड देखील १९ जानेवारीलाच प्रदर्शित झालेला आहे. नेटफ्लिक्सवर तो प्रेक्षकांना पाहता येईल.

लव ऑन द स्पेक्ट्रम २

१९ जानेवारीला लव ऑन द स्पेक्ट्रमचा सीझन २ रीलीज झाला आहे. ऑस्ट्रेलियन रिअॅलिटी टेलिव्हिजन शो आहे. ऑटिझ्म पीडित रुग्णावर तो आधारित आहे. नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

ब्लू बीटल

हॉलीवूडची सुपरहिरो फिल्म ब्लू बीटल १८ जानेवारीलाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. जिओ सिनेमावर तुम्ही ती पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

SCROLL FOR NEXT