OTT Release In First Week Of February
OTT Release In First Week Of February Saam TV
मनोरंजन बातम्या

OTT Release: हाऊसफुल ठरला फेब्रुवारीचा पहिला आठवडा, 'या' धमाकेदार वेबसीरीज आणि चित्रपटांचा विकेंडला लुटा आनंद

Pooja Dange

OTT Release In First Week Of February 2023: प्रेक्षकांच्या मनोरंजनाचे बदललेले स्वरूप आहे. अनेक उत्तम कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातही काही चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित झाले आहेत. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा थ्रिलर चित्रपट वध, लव्ह अँड वॉरची जहानाबाद ही क्राईम वेब सीरिजही काल म्हणजेच ३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्या आहेत.

ओटीटी प्रेमींसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. या शुक्रवारी अरबाज खानचा शो 'द इनव्हिन्सिबल' बॉलीवूड बबल या यूट्यूब चॅनेलवर लेटकास्ट झाला आहे. याशिवाय आणखी काही हिंदी शो आणि इंग्रजी चित्रपटही या आठवड्यात ओटीटीवर आले आहेत. या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या संपूर्ण कलाकृतींची यादी पाहूया.

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांचा 'वध' हा चित्रपट ३ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. तुम्ही तो Netflix वर पाहू शकता. 'वध' हा एक थ्रिलर चित्रपट आहे जो यापूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला तरी समीक्षकांनी या चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे.

अरबाज खानचा चॅट शो देखील ओटीवर प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड बबलच्या यूट्यूब चॅनलवर त्याचा चाट शो प्रसारित झाला आहे. या शोमध्ये सलमान खानपासून ते जावेद अख्तरपर्यंत आणि शत्रुघ्न सिन्हा ते वहिदा रहमानपर्यंत बॉलीवूडचे अनेक मोठे स्टार्स त्यांच्या आयुष्याबद्दल आणि संघर्षाबद्दल बोलणार आहेत.

सोनी लिव्हवर लव्ह अँड वॉरची जहानाबाद ही क्राईम वेब सीरीजही आली आहे. बिहारच्या जहानाबादची गुन्हेगारी उलथापालथ या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आली आहे. ही वेबसीरीज एका प्रेमकथेभोवती फिरते. सुधीर मिश्रा यांनी ही वेबसीरीज दिग्दर्शित केली आहे.

3 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर हिंदी वेबसीरीज क्लासही प्रदर्शित झाली आहे. यामध्ये दिल्लीतील एका पब्लिक स्कूलची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांच्या प्रवेशाची आणि संघर्षाची कथा दाखवण्यात या वेबसीरीज चित्रित करण्यात आली आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन आशिम अहलुवालिया यांनी केले आहे.

'ट्रू स्पिरिट' हा इंग्रजी चित्रपट नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या मुलीला सर्वात कमी वयात जगाच्या समुद्रात फेरफटका मारून विक्रम करायचा आहे.

प्राइजफायटर - द लाइफ ऑफ जेम बेल्चरची कथा देखील प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपटात आधुनिक बॉक्सिंगवर आधारित आहे. हा चित्रपट एक डार्क फॅमिली ड्रामा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ruby Roman Grapes : ही द्राक्षे तयार करण्यासाठी लागली १४ वर्षे, एका घडाची किंमत आहे १० लाख

Raj Thackarey: उद्धव ठाकरे गेल्या १०वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा सवाल

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

SCROLL FOR NEXT