Famous Actress Death SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजन विश्वावर शोककळा

Famous Actress Passed Away : मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

Shreya Maskar

ज्येष्ठ अभिनेत्रीचे राहत्या घरी निधन

मनोरंजन विश्वावर शोककळा

अभिनेत्रीच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे. 'होम अलोन 2' मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ब्रेंडा फ्रिकर (Brenda Fricker) यांचे निधन झाले आहे. ब्रेंडा फ्रिकर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी डब्लिनमधील तिच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

BBC च्या वृत्तानुसार एजंट फिल बेलफील्ड यांनी माहिती दिली की, ब्रेंडा फ्रिकर यांचे निधन 16 जुलै 2026 रोजी झाले. अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मनोरंजन सृष्टी शोकसागरात बुडाली. अभिनेत्रीच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेंडा फ्रिकर कोण होत्या?

अभिनेत्री ब्रेंडा फ्रिकरचा जन्म 17 फेब्रुवारी 1945 रोजी झाला. सुरुवातीच्या काळात त्या आयरिश एका मोठ्या कला दिग्दर्शकाची सहाय्यक म्हणून काम करत होत्या. 60 च्या दशकात 'ऑफ ह्युमन बॉन्डेज' मध्ये अभिनयाची त्यांना संधी मिळाली. त्यांचा कोरोनेशन स्ट्रीट हा ड्रामा खूपच सुपरहिट ठरला. ब्रेंडा फ्रिकर त्यांच्या ‘सीकर्स’, ‘सो आय मॅरीड ॲक्स मर्डरर’, ‘कॅज्युल्टी’ आणि ‘माय लेफ्ट फूट’ या भूमिकांसाठीही प्रसिद्ध होत्या. ब्रेंडा फ्रिकर यांनी 1969 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

फ्रिकर या ऑस्कर मिळवणारी पहिली आयरिश अभिनेत्री होत्या. ब्रेंडा फ्रिकर यांनी १९८९ मधील 'माय लेफ्ट फूट' (My Left Foot) या चित्रपटात 'मिसेस ब्राउन'ची भूमिका साकारल्याबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला.गेल्या काही वर्षांतील त्यांच्या इतर कामांमध्ये 'सो आय मॅरीड ॲन एक्स मर्डरर', 'ब्राइड्स ऑफ क्राइस्ट', 'द फिकेल्स', 'द फिकेल्स', 'द फिकेल्स', 'सो आय मॅरीड ॲन एक्स मर्डरर'चा समावेश होता. आउटफिल्ड', 'दुरांगो', 'अ टाइम टू किल', 'क्लाउडबर्स्ट' यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT