Oscar 2025 google
मनोरंजन बातम्या

Oscar 2025: भारताचं ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं; प्रियंका चोप्राला मात देत 'या' चित्रपटाने मारली बाजी

Priyanka Chopra Film Anuja Lost the Oscar Competition: अमेरिकेच्या लॅास एंजेलिसमध्ये झालेल्या ऑस्कर अवॅार्ड शोमध्ये विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अनुजा हा चित्रपट भारताला पहिला ऑस्कर जिंकून देईल अशी आशा होती. परंतु भारताचा हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकलेले नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेच्या लॅास एंजिलेसमध्ये काल ऑस्कर पुरस्करा सोहळा पार पडला. यामध्ये ऑस्कर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. वेगवेगळ्या श्रेणीतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. परंतु यामध्ये भारताचा ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंग झालं.

२०२३ मध्ये 'द एलिफेंट विस्पर'साठी ऑस्कर अवॅार्ड जिंकणारी भारतीय फिल्म प्रोड्यूसर गुनीत मोंगा यांचा 'अनुजा' हा चित्रपट या वर्षीच्या ऑस्कर अवॅार्डसाठी नामांकित झाला होता. या चित्रपटाला लाईव्ह अॅक्शन चित्रपट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. परंतु हा चित्रपट ऑस्कर अवॅार्ड जिंकू शकला नाही. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या शर्यतीत आय एम नॅाट अ रोबोटने अनुजा चित्रपटाला मात देत ऑस्कर अवॅार्ड जिंकला.

फिल्म प्रोड्यूसर गुनीत मोंगासह, बॅालिवूडसह हॅालिवूड गाजवणारी प्रियंका चोप्राचे देखील या चित्रपटासोबत खास नातं आहे. प्रियांका चोप्रा ही 'अनुजा' या भारतीय-अमेरिकन चित्रपटाची एक्जिक्यूटिव्ह प्रोड्यूसर म्हणजेच चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे. अनुजा दिल्लीतील एका ९ वर्षांच्या मुलीची कथा आहे. हा चित्रपट अॅडम जे. ग्रेव्हज यांनी दिग्दर्शित केला आहे. अनुजा ही एक शॅार्ट फिल्म म्हणजेच लघुपट आहे. या लघुपटाची कथा एका ९ वर्षांच्या मुलीभोवती फिरते. ही ९ वर्षांची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत एका कारखान्यात काम करते. मुलीला तिच्या अभ्यासादरम्यान काम करावे लागते.

चित्रपटात दाखवले आहे की, एका ९ वर्षांच्या मुलीला बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्याची सुवर्णसंधी मिळते. पण जेव्हा मुलगी एक निर्णय घेते ज्यामुळे तिचे आणि तिच्या बहिणीचे जीवन बदलते तेव्हा कथेला एक मनोरंजक वळण मिळते. या मुलीची भूमिका सजदा पठाणने साकारली आहे. सजदा २०२३ च्या 'द ब्रेड' या फीचर फिल्ममध्येही दिसली होती.

लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट मूव्ही श्रेणीमध्ये 'अनुजा' सोबत, 'अ लिएन', 'आयम नॉट अ रोबोट', 'द लास्ट रेंजर' आणि 'अ मॅन हू कुड नॉट रिमेन सायलेंट' सारखे उत्तम चित्रपट शर्यतीत होते. अन्य चित्रपटांना मागे टाकत 'आय नॉट अ रोबोट' ने यंदाचा ऑस्कर अवॅार्ड जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT