Orry  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Orry : ऑरीच्या अडचणी वाढल्या, 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसांकडून समन्स

Orry Summoned By Mumbai Police: 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीची चौकशी केली जाणार आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडमधील सिनेस्टारची ड्रग्ज पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

याच प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीची चौकशी केली जाणार आहे.

पोलिसांनी ऑरीला समन्स पाठवलं आहे.

बॉलिवूड पार्टीमध्ये चारचाँद लावणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांनी ऑरीला समन्स पाठवले आहे. 252 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी ऑरीचे नाव समोर आले आहे. त्यामुळे अँटि नारकोटिक्स सेलनं त्याला समन्स पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी ऑरीला 20 नोव्हेंबर 2025 रोजी 10 वाजता अँटि नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटमध्ये बोलावले आहे. तेथे त्याची चौकशी केली जाणार आहे.

अलिकडेच बॉलिवूडमधील सिनेस्टारची ड्रग्ज पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यामुळे बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन उघड झालं आहे. 28 ऑक्टोबर 2025 ला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 21.8 किलोग्राम मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज जप्त केले ज्याची किंमत सुमारे 252 कोटी रुपये होती. ओरीला याच प्रकरणात साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आरोपी मोहम्मद सलीम शेखला दुबईतून भारतात आणण्यात आले. शेखनेच बॉलिवूडमधील कलाकरांना अंमली पदार्थ पुरवल्याची माहिती पोलिसांना दिली. ज्यात श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, नोरा फतेही, ओरहान अवत्रामणी ऊर्फ ओरी, अंडरवरल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अतिशाह पारकर, अब्बास-मस्तान यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचा ड्रग्ज पार्टीत समावेश होता असे सांगण्यात आले.

ऑरीसोबतच श्रद्धा कपूर, नोरा फतेहीची नावे देखील या प्रकरणात आली आहेत. तेव्हा काही दिवसांपूर्वी नोराने सोशल मीडियावर पोस्ट करून या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, "मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी कामावर प्रेम करते. माझ्या सुट्टीच्या दिवशी मी दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर किंवा माझ्या हायस्कूलच्या मित्रांसोबत असते. माझे नाव सहजरित्या टार्गेट केले जाते. पण यावेळी मी ते होऊ देणार नाही. माझा कोणताही संबंध नसलेल्या गोष्टीशी माझे नाव जोडण्याचा, फोटो वापरण्याचा प्रयत्न करू नका. यापासून कृपया दूर रहा. नाहीतर याची मोठी किंमत मोजावी लागेल"

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. ओरहान अवात्रामणी ऊर्फ 'ओरी' (Orry) या नावाने ओळखला जातो. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. ओरीच्या चौकशीनंतर या प्रकरणात कोणते मोठे खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ice Use For Face: ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्याला लावा बर्फ, काचेसारखी चमकेल त्वचा

Maharashtra Live News Update: बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र! शिवसेनेकडून खासदार होणार्‍या ज्योती वाघमारे कोण आहेत?

Pune Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव कंटेनरने ३ ते ४ वाहनांना उडवलं

Nashik : व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट देता येणार नाही, कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT