Onkar Bhojane Favourite Social Media Influencer Instagram
मनोरंजन बातम्या

Onkar Bhojane News: ओंकारलाही पडली सोशल मीडिया एन्फ्लुएंसरची भुरळ; थेट नावच सांगितलं अन् फॉलोही करतो...

ओंकार सध्या आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेत दिसत नसला तरी त्याची चर्चा मात्र सर्वत्र आहे.

Chetan Bodke

Onkar Bhojane Favourite Social Media Influencer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातील अनेकांना वेड लावले आहे. या मालिकेतील अनेक कलाकार घराघरात पोहोचले असून मालिकेत पात्रांमध्ये देखील स्वत:ला चाहते शोधण्याचा प्रयत्न करतात. ही पात्र साकारणारे कलाकार देखील चाहत्यांचे फारच आवडीचे झाले. त्यातील एक कलाकार म्हणजे ओंकार भोजने.

ओंकार सध्या आपल्याला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेत दिसत नसला तरी त्याची चर्चा मात्र सर्वत्र आहे. ओंकारचा मुख्य भूमिकेतील पहिला चित्रपट 'सरला एक कोटी' काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये देखील त्याने उत्तम काम केले आहे.

ओंकार जरी सोशल मीडियावर फार सक्रिय नसला तरी तो त्याच्या चाहत्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. 'सरला एक कोटी' या चित्रपटानंतर त्याची पुन्हा चर्चा रंगली आहे. त्याच कारण म्हणजे त्याच नवीन व्यावसायिक नाटक 'करून गेलो गाव'. ओंकारच्या या व्यावसायिक नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून त्याच हे नाटक हाऊसफुल्ल झालं आहे. याचेच औचित्य साधत ओंकारने इ-सकाळ सोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.

नुकतंच बहुआयामी कलाकार ओंकारने इ-सकाळला पॉडकास्ट मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचा शो ते या चित्रपट प्रवास आता नाटकाचा अनुभव, त्याचं यश पाहिल्यानंतर घरच्याची प्रतिक्रिया या अनेक विषयवार ओंकारने या unplugged पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या आहेत. (Marathi Actor)

ओंकारला जेव्हा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा सुरू होती, यावेळी त्याने एकंदर त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले, "प्रेम हे ठरवून होत नाही आणि मला ते कधी झालं नाही. मी पहिल्यापासूनच या सगळ्या भानगडीत पडत नाही. लग्नाची सगळी जबाबदारी घरच्यांनी आणि मित्र परिवारांनी घेतली असल्यामुळे त्याचा विचार करण्याची आता काही गरज नाही."

सोबचतच पुढे ओंकारला तुझी मराठी सिनेसृष्टीत कोणती अभिनेत्री क्रश आहे का? असं विचारलं असता, तेव्हा तो म्हणतो, खरं क्रश वैगेरे नाही, मात्र त्याला 'कोकण हार्टेड गर्ल' ही त्याला खुप आवडत असून तिला फॉलोही करतो. तिचा स्वभाव सुद्धा त्याला खुप आवडतो. त्याला ती ज्याप्रकारे अनेक सामाजिक मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करते, त्या प्रकरणावर परखड मत मांडण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे तिला फॉलो करायला ओंकारला आवडतं. तो तिचा फक्त एक फॅन आहे. हे मात्र ओंकारनं आवर्जून सांगितलं

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर ही सोशल मिडियावरील खुपच प्रसिद्ध चेहरा आहे. ती तिचे व्हिडिओ मालवणी भाषेत करते. तिची तरुणांमध्ये खुपच क्रेझ आहे. तिचे बरेच व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT