Satish Rajwade and Riteish Deshmukh Holding Guinness World Record  Saam TV
मनोरंजन बातम्या

Star Pravah Set World Record : रितेश देशमुखच्या 'वेड'निमित्त स्टार प्रवाह वाहिनीने केला नवा विक्रम; रचला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स

Riteish Deshmukh : २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

Pooja Dange

Ved World TV Premium Star Pravah Set Guinness World Record :

स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. लाखो प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनात स्टार प्रवाह वाहिनीने हक्काचं स्थान मिळवलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

२० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ब्लॉकबस्टर वेड चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला.

वेड सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला. ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल १४४६ छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली.

मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डससाठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुखने या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

स्टार प्रवाहने वेड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत अश्या शब्दात रितेश देशमुख यांनी भावना व्यक्त केली.

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, ‘मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे.

स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा २० ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.’

तेव्हा प्रेमातला वेडेपणा पुन्हा एकदा अनुभवायला सज्ज व्हा. पाहायला विसरु नका वेड रविवार २० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर आणि २७ ऑगस्टला रात्री ८ वाजता हिंदीमध्ये स्टार गोल्डवर. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT