अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘OMG 2’ हा चित्रपट ११ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अमित राय दिग्दर्शित चित्रपटाचं प्रेक्षकांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही आणि समीक्षकांनीही चित्रपटाचं विशेष कौतुक केलं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याची चर्चा सुरु होती. अखेर प्रेक्षकांना याचं उत्तर मिळालं आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘OMG 2’ सोबत ‘गदर २’ सुद्धा प्रदर्शित झाला होता. ‘गदर २’ला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असताना ‘OMG 2’ला ही देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने एकट्या भारतात १७७. २९ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने २२१ कोटींचा टप्पा गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ८ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नुकतंच नेटफ्लिक्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सांगितले की, “आम्ही तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलो आहोत. ‘OMG 2’ ८ ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.” त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांना आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर घरबल्या पाहता येणार आहे.
‘OMG 2’ बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत पंकज त्रिपाठी, यामी गौतम महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले असून हा २०१२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. तर चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटिया, ज्योती देशपांडे, अजीत अंधारे, स्वरूप परेश रावल, हेमा ए. ठक्कर, विपुल डी. शाह, अश्विन वर्दे आणि राजेश बहल यांनी केली आहे.
एकंदरितच अक्षयच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘OMG 2’ नंतर अक्षय कुमारचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे, तर ‘मिशन राणीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.