ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! या मराठी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ Saam Tv
मनोरंजन बातम्या

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! या मराठी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं मीडियावर अनेक विषयांवरील मिम्स ,जोक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट हे गाणं मीडियावर अनेक विषयांवरील मिम्स ,जोक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एवढच नव्हे तर अनेक गाणी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असंच एका मराठी गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. केवळ 4 आठवड्यातचं या गीताला 10 मिलियन व्ह्यूज मिळालेत.

मुंबई: आपल्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. कधी एखादा कोणाचे काही खास फोटो, धम्माल मस्तीचे व्हिडिओ, तर कधी एखादं भन्नाट गाणं. असच एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान झालं आहे. 'ओ शेठ... तुम्ही नादंच केलाय थेट' या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

हे देखील पहा-

आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या स्टेटसवर हे गाणं पाहायला मिळत आहे. आणि अनेकांनी तर त्यांनी त्यांच्या रिंगटोन आणि कॉलरट्यूनवर हे गाणं ठेवून नाद केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या शेठ या शब्दावरून नाशिकच्या संध्या केशे आणि उस्मानाबादच्या प्रणिकेत खुने या दोघांनी या गीताची रचना केली आणि संगीतबद्ध केलंय.

जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली,

नावाला तुमच्या डिमांड आली

ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट',

असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर या गाण्यावर अनेक लहान व्हिडिओ रिल्स बनवले जात आहेत. या गाण्याने तरुणाईला प्रचंड वेड लावल्याचे पाहायला मिळत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगांवमध्ये भाजपचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

Chanakya Niti: पुरुषांच्या या 6 सवयी करिअर करतात उद्धवस्त, आत्ताच व्हा सावध अन्यथा...

फटाक्यांच्या फॅक्टरीत अग्नितांडव; १३ जणांचा मृत्यू, स्थानिकांची मदतीसाठी धावाधाव

100 रिक्षांना हात दाखवला तरी एकही थांबली नाही; लेकाला कडेवर घेऊन बाप दीड तास उभा, मनसेचे माजी आमदार संतापले

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

SCROLL FOR NEXT