Nora Fatehi Lavani Dance
Nora Fatehi Lavani Dance Instagram/@norafatehi
मनोरंजन बातम्या

ना नऊवारी साडी, ना नाकात नथ...; बोल्ड ड्रेसमध्ये नोरा फतेहीचे लावणीवर ठुमके!

Sanika

Nora Fatehi Lavani Dance: नोरा फतेही डान्स दिवाने ज्युनियरची जज आहे आणि तिचे व्हिडिओ अनेकदा शोच्या सेटवरून व्हायरल होतात. आता नोरा फतेहीचा (Nora Fatehi) आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. पण यावेळी नोराच्या डान्स व्हिडिओमध्ये (Dance Video) काय खास आहे? असे तुम्हाला वाटले असेल कारण नोरा एक उत्तम डान्सर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण यावेळी डान्स व्हायरल होण्याचे कारण म्हणजे यावेळी नोराने बेली किंवा हिप हॉप स्टाइल नाही तर लावणी केली आहे! होय !

नोरा फतेही डान्सची फॅन आहे हे आम्हाला-तुम्हाला आधीच माहीत आहे. नोराची ही आवड तिला भारतात घेऊन आली आणि आता ती इथेच राहिली आहे. नोरा खूप छान नृत्य करते. तिने अनेकवेळा बोलून दाखवले आहे की, नोराला भारतीय नृत्य (Indian Dance Forms) प्रकारातही खूप रस आहे. त्यामुळे डान्स दिवानेच्या सेटवर लावणी डान्स करण्याची संधी मिळाल्यावर तिने ही संधी हातातून जाऊ दिली नाही. विशेष म्हणजे यावेळी डान्स करताना तिने नोराने नऊवारी साडी नेसली नाही किंवा तसा मेकअपही केला नाही, पण तरीही नोराने शानदार स्टाईलमध्ये लावणी करून सर्वांना चकित केले आहे.

पाहा व्हिडिओ-

नोरा फतेहीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. पण तिच्या घरात डान्सला सक्त मनाई होती, तरीही नोरा तिच्या खोलीचे दरवाजे बंद करून नाचायची, असे तिने अनेकवेळा सांगितले आहे. डान्समुळे नोराने घरच्यांचा माराही खाल्ला आहे पण तिने आपले पॅशन कधीही सोडले नाही. तिच्या या जिद्दीने ती आज मोठी स्टार बनली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule On Dynasticism | होय आम्ही घराणेशाहीतून आलो, सुळे यांची कबुली

Lok Sabha Election: काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यास आर्थिक सर्वेक्षण करणार, राहुल गांधी यांची घोषणा

Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

Goa Airport News Today: गोवा विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची मेलद्वारे धमकी आल्यानं खळबळ

Benifits of Buttermilk: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

SCROLL FOR NEXT