Nora Fatehi in Saree Viral Video Instagram/@ instantbollywood
मनोरंजन बातम्या

Video: नोरा फतेहीची गुलाबी साडी चर्चेत; पावसापासून वाचवण्यासाठी बॉडीगार्ड्सची कसरत

Nora Fatehi in Saree: नोराच्या सुंदर गुलाबी साडीचा पदर खराब होऊ नये म्हणून् दुसऱ्या बॉडिगार्डने तिचा पदर हातात घरत तिला स्टुडिओत पोहोचवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: नोरा फतेही (Nora Fatehi) भारतीय लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते. नोरा फतेहीला साडी (Saree) नेसायला आवडते, म्हणून जेव्हा जेव्हा नोराला भारतीय लूक दाखवायचा असतो तेव्हा ती खूप सुंदरपणे कॅरी करते. स्टुडिओत जात असताना मुंबईत मुसळधार पावसात कोसळत होता. अशात गुलाबी साडी परिधान केलेली नोरा आपल्या गाडीतून उतरली आणि एका क्रूने तिच्या डोक्यावर छत्री धरत तिला पावसात भिजण्यापासून वाचललं. मात्र तिच्या सुंदर गुलाबी साडीचा पदर खराब होऊ नये म्हणून् दुसऱ्या बॉडिगार्डने तिचा पदर हातात घरत तिला स्टुडिओत पोहोचवले. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

डान्स दिवाने ज्युनियरच्या (Dance Deewane Juniors) सेटवर, नोराचा देसी अवतार पुन्हा दिसला आणि चाहते तिला गुलाबी साडीत पाहून थक्क झाले. जरी नोराला प्रत्येक रंगातले कपडे सूट करतात, परंतु जेव्हा गुलाबी रंग येतो तेव्हा नोरा गुलाबासारखी फुलते. यावेळी जेव्हा नोरा फतेही गुलाबी रंगाच्या साडीत दिसली तेव्हा या सौंदर्याची चाहूल आणखीनच फुलली. नोराच्या सौंदर्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. नोराच्या डिझायनर ब्लाउजने फॅन्सचे लक्ष वेधून घेतले. साडीचा ब्लाउज पंखांच्या शैलीत बनविला गेला होता जो बॅकलेस होता, नोराच्या ग्लॅमरस लूकने कहर केला होता.

अलीकडे नोरा फतेही तिच्या आयफातील कामगिरीमुळे खूप चर्चेत होती. नोराने बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या मंचावर परफॉर्म करण्याची ही पहिलीच वेळ होती. रिअॅलिटी शो मध्ये सर्वात जास्त पसंद केल्या जाणाऱ्या कलर्स वाहिनीवरील 'डांस दीवाने जूनियर्स' च्या सेटवर नेहमीच काहीना काही गमतीदार किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा नुकताच या सेटवर घडला जेव्हा, शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या आगामी चित्रपट 'निक्कमा'च्या प्रोमोशनसाठी 'डांस दीवाने जूनियर्स' या कार्यक्रमात 'अभिमन्यु दासानी' आणि 'शर्ली सेट्टा' यांच्यासोबत पाहुणी म्हणून आली होती. या कार्यक्रमामध्ये 'नीतू सिंग' (Neetu singh), 'मर्जी पेस्टिनजी' आणि 'नोरा फतेही' (Nora Fatehi)हे पर्यवेक्षण करत असून 'करन कुन्दरा' (Karan Kundrra)हा सूत्रसंचालन करत आहे. शिल्पा शेट्टी आल्यावर तिचा आणि नोरा फतेहीचा नृत्य सामना होता गाजला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

Mumbai Rain: मुंबईत उद्या शाळांना सुट्टी? पुढचे १२ तास महत्वाचे, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचे धुमशान; मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जाणून घ्या कुठे काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT