Raju Srivastava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastav Health Update : राजू श्रीवास्तवला भेटण्यास कोणालाही परवानगी नाही, कारण...

डॉक्टरांना राजूच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ नये म्हणून कोणालाही त्याला भेटून देत नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Srivastav Health Update |मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) गेल्या १० दिवसांपासून रुग्णालयात आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्यायाम करत असताना राजूला हृदयविकाराचा झटका आला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या मेंदूची ऑक्सिजन पातळी पूर्वी २० टक्के होती, जी आता ५० टक्के झाली आहे. राजू श्रीवास्तवला भरपूर एंटीबायोटिक औषधे दिली जात आहेत. परंतू डॉक्टरांना राजूच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ नये म्हणून कोणालाही त्याला भेटून देत नाहीत.

मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव हा देशातील टॉप (Neurologists) न्यूरोलॉजिस्ट एमव्ही डॉ. पद्मा श्रीवास्तव यांच्या देखरेखीखाली आहेत. राजूला बरं होण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचा रक्तदाब आता नियंत्रित आहे. मधल्यावेळात मेंदूतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राजूची प्रकृती ढासळत होती. मात्र आता तो बरा होत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तवची पत्नी शिखा श्रीवास्तव थोडी अस्वस्थ आहे. कारण डॉक्टरांनी कुणालाही आयसीयूमध्ये जाण्यास मनाई केली आहे. डॉक्टरांना कोणताही धोका पत्करायचा नाही. राजूला कोणीही येऊन भेटलं तर संसर्ग होऊ शकतो. सध्या राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, कॉमेडियन आणि अभिनेता जॉनी लीव्हरने राजू श्रीवास्तवच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राजूच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी तो मुंबईहून दिल्लीला गेला. राजू श्रीवास्तवचा बालपणीचा मित्र आशु त्रिपाठीने कानपूरच्या किडवाई नगर येथील राधा माधव मंदिरात राजूला लवकर बरे वाटण्यासाठी भजन संध्याचे आयोजन केले होते.

आशु त्रिपाठीने त्याच्या घराभोवती ५१ झाडे लावून राजूच्या दीर्घ आरोग्यासाठी प्रार्थना केली. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरातही त्याने पूजा केली. कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून संपूर्ण देशभरातील त्याचे चाहते प्रार्थना करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी पावसाचे आगमन, पालघरसह नाशिकला ऑरेंज अलर्ट, कुठे कसा असणार पाऊस, वाचा

iPhone 17: आयफोन १७ केवळ २ दिवसांत लाँच होणार, किंमत आणि फीचर्स चर्चेत

Chandra Grahan 2025: आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; तब्बल ८२ मिनिटं दिसणार Blood Moon, जाणून घ्या सुतक काळ

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT