Bhagya Dile Tu Mala Saam TV
मनोरंजन बातम्या

Bhagya Dile Tu Mala Update: 'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, मालिकेत नव्या व्यक्तीच्या येण्याने रत्नमाला मोहितेचा भूतकाळ येणार समोर

Actor Tushar Dalvi In Marathi Serial: अनिरुद्धच्या येण्याने रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Pooja Dange

Bhagya Dile Tu Mala Latest Episode:

कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' ही मालिकेतून कावेरी आणि राज आपल्या भेटीला आले. या दोघांच्या जोडीला प्रेकक्षकांची पसंती मिळाली. कावेरी आणि राज यांनी आतापर्यंत अनेक संकटाना तोंड दिले. त्यांना त्यांच्या या प्रवासात रत्नमालाने साथ दिली.

कलर्स मराठीने नुकताच 'भाग्य दिले तू मला' मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाल्याचे दिसत आहे. या नवीन व्यक्ती कोण? याचा व्यक्तीचा रत्नमाला आणि तिच्या कुटुंबाशी काय संबंध असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

प्रोमोमध्ये दिसणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रत्नमालाचा नवरा अनिरुद्ध आहे. अनिरुद्धच्या येण्याने या मालिकेला नवीन वळण मिळणार आहे.

रत्नमालाच्या पतीचे निधन झाले असल्याचे मालिकेत दाखविण्यात आले होते. त्यामुळे अनेक वर्षांनी अचानक तिचा नवरा कुठून आला? तो जिवंत कसा? जिवंत होता तर इतकी वर्ष कुठे होता? घरी का आला नाही? असे अनेक प्रश्न रत्नमालासह प्रेक्षकांना पडणार आहेत.

अनिरुद्धच्या येण्याने रत्नमाला मोहितेचा भूतकाळ आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत एक मोठा ट्विस्ट यानिमित्त आला आहे. मालिकेत आलेले अनिरुद्ध हे नवे पात्र आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते तुषार दळवी साकारणार आहेत. (Latest Entertainment Update)

निवेदिता सराफ म्हणजेच रत्नमाला मालिकेत येणाऱ्या नवीन रंजक वळणाविषयी म्हणाल्या, “प्रेक्षकांनी आतापर्यंत आमच्या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला. आता आमची मालिका एक नवीन वळण घेते आहे. आता रत्नमालाच्या पुर्वायुष्यातील एक खूप मोठं रहस्य लोकांसमोर येणार आहे आणि ते रहस्य म्हणजे रत्नमालाचे पती जिवंत आहेत, लवकरच प्रेक्षकांना आणि रत्नमलालाही हे कळणार आहे. त्यांचं नाव आहे अनिरुद्ध. अनिरुद्ध कुठे होते? काय झालं? इतक्या वर्षात रत्नमालाला ते का भेटले नाही?, आताच का समोर आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ही मालिका बघताना मिळणार आहेत. त्यामुळे नक्कीच तूमचं खूप मनोरंजन होणार आहे.

हे मालिकेतलं नवं वळण नक्कीच तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर माझा खूप चांगला मित्र आणि आवडता सहकलाकार तुषार दळवी ही भूमिका साकारतोय त्यामुळे ही मला खूप आनंद झाला आहे. कारण मी तुषारबरोबर आधी ही काम केलं आहे. आमचा खूप छान इक्वेशन आहे. तुषारसारख्या सीनियर एक्टर बरोबर काम करायला खूप मजा येत आहे. तुषार या व्यक्तिरेखेमध्ये काम करतोय ही खूप छान गोष्ट आमच्या मालिकेत घडली. खूप वेगवेगळी छान वळणं या मालिकेत तुमच्यासमोर येणार आहेत, खूप इमोशनल सीन्स असणार आहेत. पुढे काय काय होतंय याची उत्सुकता माझी ही ताणली गेली आहे तुमची ही ताणली जाणार आहे.”

रत्नमालाला ऑफिसमध्ये मंगळसूत्र मिळतं. त्यानंतर तिला अनिरुद्धने दिलेल्या मंगळसूत्रची आठवण होते. तेव्हा झालेले संभाषण तिला आठवते. अनिरुद्धने रत्नमाला त्यांच्या गावी गुहागरला राहात असताना मंगळसूत्र दिले होते. त्या काळच्या गोष्टी तिला आठवतात. रत्नमाला आधीपासूनच तत्वांना धरून चालणारी आहे. त्या काळी सुध्दा जेव्हा अनिरुद्ध व तिचे मतभेद व्हायचे तेव्हाही तिच्या मतांवर ठाम असायची.

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत अनिरुद्ध आणि रत्नमालाची स्टोरी बघायला मिळणार आहे आणि याचनिमित रत्नमालाचा नवा लूक देखील समोर येणार आहे. ज्यामध्ये तिला भूतकाळातील नवऱ्यासोबतचे काही क्षण आठवणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT