Nivedita Saraf SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nivedita Saraf : निवेदिता सराफ यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक! 'या' अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रिन

Aai Aani Baba Retire Hot : सर्वांची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराफ पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. त्यांची नवीन मालिका काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

अशोक मामांची पत्नी निवेदिता सराफ (Nivedita Saraf) पुन्हा एकदा छोटा पडदा जागवण्यासाठी सज्ज आहेत. निवेदिता सराफ आणि मंगेश कदम (Mangesh Kadam) हे दोघही 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मालिकेची वेळ आता जाहीर करण्यात आली आहे. असा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' (Aai Aani Baba Retire Hot Aahet ) ही मालिका 2 डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुपारी 2.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.

स्टार प्रवाहच्या (Star Pravah) सोशल मीडियावरून एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात ही माहिती दिली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

आई- बाबा मुलांच्या चांगल्या उज्वल भविष्यासाठी किती कष्ट घेतात आणि त्यांचा संघर्ष काय असतो. यावर ही मालिका आधारित आहे. तसेच आयुष्यभर मुलांसाठी झगडणाऱ्या वडिलांना रिटायरमेंटनंतरही स्वतःला वेळ मिळेल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या मालिकेत अभिनेते मंगेश यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना गावी जाऊन राहण्याची इच्छा असते. मात्र कुटुंबाच्या जबाबदारीतून त्यांचे हे स्वप्न कसे पूर्ण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. निवेदिता सराफ यांनी अनेक हिट चित्रपट, नाटके आणि मालिका केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT