Hollywood Actress New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actress New Song : हॉलिवूड अभिनेत्री जोपासतेय भारतीय संस्कृतीचा वारसा; मैथिली भाषेत गायली सुंदर अंगाई

Neetu Chandra: नितू चंद्रा यांनी आईची इच्छा केली पुर्ण.

Pooja Dange

Neetu Chandra Produce Song For Kids:

हॉलीवूड अभिनेत्री नितू चंद्रा संस्कृती आणि परंपरेबद्दल तिच्या असलेल्या अतुलनीय प्रेमासाठी ओळखली जाते. मैथिली ही भारत आणि नेपाळच्या काही भागांमध्ये बोलली जाणारी इंडो-आर्यन भाषा आहे. नितू चंद्रा यांनी मैथिली भाषेतील अंगाई 'निनिया राणी'ची निर्मिती केली आहे.

तिला तिच्या डिजिटल यूट्यूब चॅनेल बेजोड आणि चंपारण टॉकीज नावाच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे जागतिक व्यासपीठावर ही खास अंगाई घेऊन जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.

नितू चंद्रा या अंगाईविषयी म्हणाल्या की, "माझ्या डिजिटल यूट्यूब चॅनेलद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती जागतिक स्तरावर नेण्याचा माझा विचार आहे. माझा हा विचार पुढे नेण्यासाठी, मी अबू धाबीमध्ये माझे प्रॉडक्शन हाऊस देखील सुरू केल आहे. सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मी हे एक पाऊल उचलले आहे. बेजोड आणि चंपारण टॉकीज हे भारतीय प्रतिभेला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी नक्कीच मदत करतील यात शंका नाही"

'निनिया राणी' ही अंगाई नितीन नीरा चंद्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यांना ज्यांचा मैथिली चित्रपट मिथिला मकानसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे सर्व जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहे.

'निनिया राणी' ही अंगाई प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर कमेंट करून नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 'हे नागरी ऐकून लहानपण आठवले.' 'हे गाणे आतापर्यंत १० वेळ ऐकले तरीही मन भरत नाहीये. तुमचे कौतुक करू तितके कमी आहे.' 'खूप सुंदर गाणे आहे' अशा कमेंट या गाण्यावर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

SCROLL FOR NEXT