Nitin Desai News  Instagram
मनोरंजन बातम्या

Nitin Desai Case : नितीन देसाईंनी ज्या कंपनीकडून कर्ज घेतलं होतं त्यांची पहिली प्रतिक्रिया

Pooja Dange

Nitin Desai Death Update : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाने भारतातील चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, हे पचवणं अनेकांना कठीण होत. नितीन देसाईंनी आत्महत्या करण्याआधी ऑडिओ रेकॉर्ड करून एडलवाईस कंपनीवर मानसिक छळाचा आरोप केला आहे.

नितीन देसाईंनी ऑडिओ क्लिपमध्ये ज्या एडलवाईस कंपनीवर आरोप केले आहेत, त्यांच्याकडून आता स्पष्टीकरण आले आहे. या स्पष्टीकरणात त्यांनी सगळ्या बाजूंची सखील चौकशी व्हावी आहे, मागणी केली आहे.

एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी पहिल्यांदा आणि मोठे स्पष्टीकरण दिले आहे. गुरुवारी दिलेल्या या स्पष्टीकरणात त्यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्या आठवड्यात नितीन देसाई यांची कंपनी एन डी आर्ट वर्ल्ड विरुद्ध दिवाळखोरीची कारवाई सुरू केलेल्या फायनान्स कंपनीने सांगितले की, ते कायदेशीर प्रक्रियेसाठी वचनबद्ध आहेत.

"आम्ही सरब संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्यास वाचनबद्द आहोत. पारदर्शकता, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याची आमची वचनबद्धता कायम राहील." असे एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलर एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आणि समूहाचे अध्यक्ष रशेष शहा ना घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा केली. यानंतर काही तासातच कंपनीने संवाद साधला.

गुरुवारी रात्री दिलेल्या निवेदनात, एडलवाईस अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने खटल्यातील घटनाक्रमांची यादी केली आणि सांगितले की, नितीन देसाई यांना राष्ट्रीय कंपनी अपील न्यायाधिकरणाने देखील दिलासा दिला नाही. १ ऑगस्ट रोजी NDArt World चे अपील फेटाळण्यात आले होते.

याविषयी NCLT ने जितेंद्र कोठारी यांची चौकशसाठी नियुक्ती केली होती. या निर्णयाविरोधात ND Art कंपनीने NCLT च्या दिल्ली खंडपीठाकडे अपील केले. मात्र १ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या खंडपीठाने देसाई यांचे अपील फेटाळून लावले, अशी माहिती अहवालात नमुद करण्यात आली आहे.

ND's Art World Pvt Ltd ने 2016 आणि 2018 मध्ये ECL फायनान्स म्हणजेच Edelweiss समूहाची शाखा असलेल्या दोन कर्जांद्वारे 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

पण पुढे जानेवारी 2020 मध्ये त्यांना परतफेडीचा त्रास सुरू झाला. जून 2022 पर्यंत जमा झालेल्या व्याजासह हे कर्ज 252 रु. कोटी इतके झाली.

नितीन देसाईंनी ऑडीओ क्लिपमध्ये N D Studio विषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. नितीन देसाई ऑडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, माझ्यापासुन N D Studio कधीही दूर करु नका. माझे अंत्यसंस्कार सुद्धा N D Studio व्हावेत अशी माझी इच्छा आहे. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT