Nisha Parulekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nisha Parulekar: अभिनय क्षेत्रातून थेट राजकारणात उडी; मुंबईच्या नगरसेविका निशा परुळेकर कोण आहेत?

Nisha Parulekar: मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपच्या उमेदवार निशा परुळेकर यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत त्यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला.

Shruti Vilas Kadam

Nisha Parulekar: मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपच्या उमेदवार अभिनेत्री निशा परुळेकर यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत त्यांनी ठाकरेसेनेचे उमेदवार योगेश भोईर यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या निशा परुळेकर यांचा हा राजकीय विजय अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे. मात्र त्यांचा प्रवास पाहिला, तर हा विजय त्यांना सहज मिळालेला नाही.

अभिनेत्री निशा परुळेकर या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरदर्शन क्षेत्रातील परिचित चेहरा आहेत. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. विशेषतः मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या ‘सही रे सही’ या नाटकातून त्या प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आल्या. या नाटकात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत काम केले होते. रंगभूमीवरील त्यांच्या सहज अभिनयाचे त्या काळात विशेष कौतुक झाले होते.

चित्रपटसृष्टीतही अभिनेत्री निशा परुळेकर यांनी आपली छाप पाडली आहे. ‘महानायक’ आणि ‘शिमणा’ या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका साध्या पण प्रभावी होत्या. यामुळे त्या प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. याशिवाय, छोट्या पडद्यावरही निशा परुळेकर यांनी विविध भूमिका साकारत घराघरात ओळख निर्माण केली.

विशेषतः ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेले महालक्ष्मी अंबाबाईचे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले. या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अभिनयासोबतच सामाजिक कामातही त्या सक्रिय राहिल्या असून, याच अनुभवातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.

अभिनेत्री निशा परुळेकर या भाजपचे विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांच्या कार्यकर्त्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय होत्या. स्थानिक पातळीवरील जनसंपर्क, सामाजिक उपक्रम आणि संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांच्या कामी आला आणि अखेर त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : राजकारणात चांगली छाप पडेल; ५ राशींचे लोक थोडे चिंतेत असाल

Malegaon Election Result 2026 : भाजपाला सर्वात मोठा धक्का, मालेगाव महापालिकेत दारुण पराभव; वाचा विजयी उमेदवारांची यादी

MIM चा भाजपला मोठा फटका; निवडणुकीत महापालिकेवरील सत्ता गेली? बॅकफूटवर जाण्याची कारणे काय?

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला; उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडला

Maharashtra Elections Result Live Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज्य येणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

SCROLL FOR NEXT