Nirmiti Sawant  saam tv
मनोरंजन बातम्या

Nirmiti Sawant : निर्मिती सावंत यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक; डॅशिंग लूकनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Nirmiti Sawant Enters In Marathi Serial : मराठमोळी अभिनेत्री निर्मिती सावंत यांची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री झाली आहे. त्या कोणत्या मालिकेत झळकणार जाणून घेऊयात.

Shreya Maskar

निर्मिती सावंत यांची छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री झाली आहे.

मराठी मालिकेत निर्मिती सावंत पुन्हा झळकणार आहेत.

'झी मराठी' वाहिनीने याचा खास प्रोमो प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.

आपल्या कॉमेडीने महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) आजवर त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने वेड लावले आहे. तसेच त्यांनी नाटकांमध्ये देखील काम केले आहे. 'कुमारी गंगुबाई नॉन-मॅट्रिक' या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. अलिकडेच निर्मिती सावंत 'झिम्मा 2' चित्रपटात पाहायला मिळाल्या.

आता छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा निर्मिती सावंत यांचे दमदार कमबॅक होणार आहे. 'झी मराठी' ने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये निर्मिती सावंत यांचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. मालिका विश्वात सध्या 'पारू' (Paaru ) आणि 'लक्ष्मी निवास' (Lakshmi Niwas ) मालिकांचा महासंगम विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या महासंगम भागात निर्मिती सावंत यांची दमदार एन्ट्री होणार आहे. त्याच्या पात्राचे नाव 'पद्मावती' असे आहे. आता ही पद्मावती' मालिकांमध्ये कोणता नवीन ट्विस्ट घेऊन येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निर्मिती सावंत यांचा लूक

व्हिडीओमध्ये नऊवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा, कपाळावर कुंकू, दागिने घालून निर्मिती सावंत यांचा लूक खुलला आहे. त्या या लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर रुबाब पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "अहिल्या आणि लक्ष्मीला भेटायला येतेय 'पद्मावती'..." या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. निर्मिती सावंत यांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

'लक्ष्मीनिवास' आणि 'पारू' या मालिकांचा महासंगम विशेष भाग 27 जुलैपासून संध्याकाळी 7.30 वाजता पाहायला मिळणार आहे. पद्मावती हे पात्र कोल्हापुरचे आहे. प्रोमोमध्ये पद्मावती अहिल्यादेवी आणि लक्ष्मीला चॅलेंज देताना दिसत आहे.

निर्मिती सावंत यांची कोणत्या मालिकेत एन्ट्री होणार?

'लक्ष्मीनिवास' आणि 'पारू' मालिकांचा महासंगम विशेष

'लक्ष्मीनिवास' आणि 'पारू' मालिकांचा महासंगम भाग कधी पाहता येणार आहे?

27 जुलै

निर्मिती सावंत यांचे मालिकेतील पात्राचे नाव काय?

पद्मावती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT